वर्ल्डकपमध्ये आम्ही एक धोकादायक...; भारताचा पराभव केल्यानंतर Shakib Al Hasan चं धक्कादायक विधान

Shakib Al Hasan : बांगलादेशाच्या या विजयामध्ये शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) मोलाची भूमिका बजावली. शाकिबने यावेळी उत्तम फलंदाजी केली. त्याने 80 बॉल्समध्ये 85 रन्सची खेळी केली. यानंतर त्याला प्लेअर ऑफ मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 16, 2023, 08:12 AM IST
वर्ल्डकपमध्ये आम्ही एक धोकादायक...; भारताचा पराभव केल्यानंतर Shakib Al Hasan चं धक्कादायक विधान

Shakib Al Hasan : एशिया कप ( Asia Cup ) स्पर्धेमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशाने टीम इंडियाचा ( Team India ) 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यातमध्ये भारताने टीममध्ये बरेच बदल केले होते. वर्ल्डकप तोंडावर असून त्याचा विचार करता हे बदल करण्यात आले होते. टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर बांगलादेशाचा कर्णधार शाकिब अल हसनने एक मोठं विधान केलं आहे.  

बांगलादेशाच्या या विजयामध्ये शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) मोलाची भूमिका बजावली. शाकिबने यावेळी उत्तम फलंदाजी केली. त्याने 80 बॉल्समध्ये 85 रन्सची खेळी केली. यानंतर त्याला प्लेअर ऑफ मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला. 

भारताच्या पराभवानंतर शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) म्हणाला, आजच्या सामन्यात आम्ही त्यांना खेळण्याची संधी दिली, ज्यांना संधी मिळाली नव्हती. पहिल्या काही सामन्यांनंतर आम्हाला वाटलं की, या ठिकाणी स्पिनर चांगली कामगिरी करतील." 

शाकिब  ( Shakib Al Hasan )पुढे म्हणाला, आज मी फलंदाजीसाठी लवकर मैदानात उतरलो होतो. यावेळी मी क्रीजवर चांगला वेळ घालवला. ही एक कठीण विकेट होती, जी सुरुवातीच्या टप्प्यावर आली होती. मात्र जसा बॉल जुना होत गेला तसं आम्हाला फलंदाजी करणं सोपं झालं होतं.

वर्ल्डकपबाबत काय म्हणाला शाकिब अल हसन

वर्ल्डकप तोंडावर आला असून याबाबत बोलताना शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) म्हणाला, जेव्हा महेदी गोलंदाजीला आला तेव्हा गोलंदाजी सोपी नव्हती. मात्र तरीही त्याने आम्हाला विकेट मिळवून दिल्या. तन्झिमने खूप चांगली गोलंदाजी करत विकेट्स काढल्या. दरम्यान अनेक खेळाडूंना दुखापत झाली असून ही थोडी समस्या आहे. मात्र वर्ल्डकपमध्ये आम्ही एक धोकादायक संघ ठरू.

टीम इंडियाचा बांगलादेशाकडून पराभव

सुपर - 4 मध्ये शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशाकडून पराभवाचा सामना करावा लागला. टॉस जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बांगलादेशाने विजयासाठी 266 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. यावेळी पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर शून्यावर बाद झाला. यानंतर केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन देखील स्वस्तात माघारी परतले.

एकाबाजूला एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या बाजूला शुभमन गिलने एकाकी झुंज सुरु ठेवली. शुभमन गिलने शानदार शतक ठोकलं. मात्र शुभमन 121 रन्सवर बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने 42 रन्सची तुफानी खेळी केली. यावेळी अक्षरने टीम इंडियाला विजयाच्या आशा दाखवल्या. मात्र तो बाद झाला आणि विजयाच्या आशाही मावळल्या. यानंतर अवघ्या 6 रन्सने टीम इंडियाचा पराभव झाला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x