Aus vs Ind: भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचं सरेंडर, Ashwin - Jadeja चा भेदक मारा

Ravindra Jadeja , Ravichandran Ashwin : बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात सुरू खेळवली जात आहे. 

Updated: Feb 9, 2023, 03:39 PM IST
Aus vs Ind: भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचं सरेंडर, Ashwin - Jadeja चा भेदक मारा title=
Ravichandran Ashwin

IND vs AUS, 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात खेळल्या गेलेल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांची जादू पहायला मिळाली. पहिला सामना नागपूरच्या (Nagpur Test) मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी मैदानात कमाल दाखवली. खास ठरले आर आश्विन (Ravichandran Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)...

कॅप्टन पॅट कमिन्सचा (Pat Cummins) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फेल ठरला. सुरूवातीला रोहितने मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपवला. त्याचं फळ टीम इंडियाला मिळालं. 2 धावांच्या स्कोअरवर कांगारू संघाला पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 15 षटकांत 2 गडी गमावून 36 धावा केल्या होत्या.  त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही.

शमी सिराजच्या जोडीनंतर रोहितने (Rohit Sharma) पीचचा अंदाज घेऊन पाच महिन्यांनंतर कमबॅक करणाऱ्या रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) हातात बॉल सोपवला. जडेजाने Labuschagne चा विकेट काढला आणि भारताला आणखी एक विकेट काढून दिली. त्यानंतर अक्षर पटेल (Axar Patel) आणि आश्विनच्या तिघाडीचा वापर करत भारताने उर्वरित फलंदाजांना तंबुत परतवलं. जडेजाने 22 ओव्हरमध्ये 47 धावा दिल्या आणि 5 विकेट नावावर केले. तर आश्विनने 15 ओव्हरमध्ये 42 धावा देत 3 गडी बाद केलेत.

आश्विनचा नवा विक्रम - 

दरम्यान, आश्विनने (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीला (Alex Carey) क्लिन बोल्ड करत मालिकेत पहिला विकेट घेतला आहे. या विकेटसमुळे अश्विनने 450 विकेटसचा टप्पा पार केला आहे. तसचे तो भारताचा माजी स्पिनर अनिल कुंबळे (Anil Kumble) नंतर अशी कामगिरी करणारे दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. आणि 450 पेक्षा अधिक विकेट घेणारा जगातला नववा फिरकी गोलंदाज ठरलाय.