IND vs Aus :रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू, दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीची जादू चांगलीच चालली आहे. रविंद्र जडेजाने मैदानात दमदार कमबॅक करत 3 विकेट घेतल्यानंतर आता अश्विनने (Ravichandran Ashwin) मोठा रेकॉ़र्ड ब्रेक केला आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करत त्याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे. 

Updated: Feb 9, 2023, 02:19 PM IST
IND vs Aus :रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू, दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक title=

India vs Australia 1st Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीची जादू चांगलीच चालली आहे. रविंद्र जडेजाने मैदानात दमदार कमबॅक करत 3 विकेट घेतल्यानंतर आता अश्विनने (Ravichandran Ashwin) मोठा रेकॉ़र्ड ब्रेक केला आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करत त्याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे. 

 

हे ही वाचा : रविद्र जडेजाचं दमदार कमबॅक, कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं

 

450 विकटेसचा टप्पा पार 

अश्विनने (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीला क्लिन बोल्ड करत मालिकेत पहिला विकेट घेतला आहे. यामुळे अॅलेक्स कॅरी 36 धावावर बाद झाला. या विकेटसमुळे अश्विनने 450 विकेटसचा टप्पा पार केला आहे. तसचे तो भारताचा माजी स्पिनर अनिल कुंबळे नंतर अशी कामगिरी करणारे दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. आणि 450 पेक्षा अधिक विकेट घेणारा जगातला नववा फिरकी गोलंदाज ठरलाय.

दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडला

अश्विनने (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीला बाद करताच भारताचा माजी स्पिनर अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळेने (Anil Kumble) 93व्या कसोटी सामन्यात हा आकडा गाठला होता. तर अश्विनने 89 सामन्यात ही कामगिरी केली आहे. मुथय्या मुरलीधरनने 80व्या कसोटीत हा आकडा गाठला होता. त्यामुळे मुरलीधरन नंतर दुसऱ्या स्थानी अश्विन येतोय.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड 

अश्विनचा (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी रेकॉर्ड खुप चांगला आहे. अश्विनने कांगारूंविरुद्धच्या 18 कसोटी सामन्यांच्या 34 डावांत 31.48 च्या सरासरीने 90 बळी घेतले आहेत. तर बॉर्डर गावस्कर टॉफीतील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट्सचे शतक पूर्ण करू शकतो. हा टप्पा गाठण्यापासून तो केवळ 10 विकेट्स दूर आहे. ऑस्ट्रेलिया हा अश्विनचा आवडता संघ आहे. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या 19 कसोटी सामन्यांमध्ये 88 बळी घेतले आहेत.