IND vs AUS Live Streaming Free: ज्या क्षणाची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण हळुहळू जवळ येऊ लागला आहे.भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम्स वनडे वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दोन्ही संघांमधील सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. 20 वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत आणि या हंगामात दमदार कामगिरी केल्यानंतर हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान हा सामना घरबसल्या फ्री कसा पाहायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वर्ल्ड कप 2023 मध्ये यजमान भारताने 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. जिथे विराट कोहलीने 50 वे एकदिवसीय शतक झळकावले आणि मोहम्मद शमीने विक्रमी सात विकेट घेतल्या. दुसरीकडेऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये शेवटचा जिंकलेला सहाव्या वनडे विश्वचषक विजेतेपदावर लक्ष ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या 2023 च्या मोहिमेची सुरुवात भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवाने झाली. पण लवकरच त्यांनी शानदार पुनरागमन केले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने उर्वरित सात गट सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.
वन डे वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया 13 वेळा एकमेकांशी खेळले असून, टीम इंडियाने केवळ पाच विजय नोंदवले आहेत. पण रोहित शर्माच्या संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अलीकडच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे आणि ते अंतिम फेरीत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशा परिस्थितीत या सामन्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया.
वर्ल्ड कप 2023 हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. असे असले तरी याचा समारंभ सोहळा दुपारी 12:30 वाजल्यापासून पाहता येणार आहे.
क्रिकेटप्रेमींना डिजिटल स्क्रीनवर हा सोहळा पाहता येईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनलचे विनामूल्य थेट प्रवाह Disney+Hotstar ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे .
डिस्नीचे प्रीमियम वापरकर्ते वेबसाइट आणि अॅप दोन्हीवर HD स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे विश्वचषक 2023 चे प्रसारण हक्क आहेत आणि फायनल स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी हिंदी, स्टार गोल्ड SD, SS1 तमिळ SD+HD, SS1 तेलुगु SD+HD, स्टार माँ गोल, SS1 वर प्रसारित केली जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरुन या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.