सिडनी : ऑस्ट्रेलिया Australia दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवरच क्रीडारसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशा या दौऱ्यात पहिल्याच सामन्यादरम्यान असं काही घडलं की, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्ट याला जाहीर माफी मागावी लागली.
सिडनी क्रिकेट ग्राऊंड Sydney Cricket Ground येथे शुक्रवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया India and Australia हा सामना सुरु असताना समालोचन करत असताना गिलख्रिस्टनं चुकून नवदीप सैनी Navdeep Saini यानं त्याच्या वडिलांना गमावल्याबद्दल सहानुभूती देणारं वक्तव्य केलं. मुळात, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू Mohammed Siraj मोहम्मद सिराज यानं काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांना गमावलं.
सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. पण, मायदेशी न परतता या आव्हानाच्या प्रसंगातही त्यानं संघासोबतच राहण्याला प्राधान्य देत वडिलांचं स्वप्न साकारण्याची जबाबदारी घेतली.
चुकून Adam Gilchrist गिलख्रिस्टनं मात्र नवदीप सैनीला सहानुभूती दिली. त्याची ही चूक लक्षात येताच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज Mitchell MccLenaghan आणि नेटकऱ्यांनी ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून अधोरेखित केली. आपली ही चूक जाणत गिलख्रिस्टनंही क्षणाचाही विलंब न लावता सैनी आणि सिराज या दोन्ही खेळाडूंची क्षमा मागितली.
Yep, thanks @Mitch_Savage My huge apologies again to all. https://t.co/F8rYsD6fxm
— Adam Gilchrist (@gilly381) November 27, 2020
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनेक नेटकऱ्यांनीही गिलख्रिस्टला ही चूक निदर्नाश आणून दिली. मुख्य म्हणजे त्यानंही ही बाब अतिशय सकारात्मकतेनं घेत झालेली चूक जाहीरपणे मान्य केली.