IND vs AUS Border-Gavaskar Trophy : टीम इंडियाने न्यूझीलंडविरद्धची तीन सामन्याची टी20 मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. या मालिका विजयानंतर टीम इंडियाचे लक्ष्य बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर (Border-Gavaskar Trophy) आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.मात्र या संघात एका खेळाडूचा समावेश करण्यात आला नाही आहे. या खेळाडूचे नाव दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)आहे. तरीही या खेळाडूने आपण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे. या त्याच्या घोषणेची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच त्याच्या या ट्विटवर भन्नाट रिप्लाय येत आहे.
भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रूवारीला सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वीच टीम इंडियाने संघाची घोषणा केली होती.या घोषणेनंतर आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टेस्टमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे. कार्तिकने ट्विट करून ही घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनंतर रिट्वीटचा आता पाऊस पडू लागला आहे.
मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात कसोटी पदार्पण केले, बरं,, ते पुन्हा होणार आहे!, अशा आशयाचे ट्विट दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने केले आहे. त्याच्या या ट्विटनंतर अनेकांना प्रश्न पडला की नेमक्या कोणत्या खेळाडूला बाहेर बसवले जाणार आहे. तर काहिंनी श्रेयस अय्यरचे नाव काढलं. त्यामुळे कार्तिक जखमी श्रेयसच्या जागी संघात सामील होत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र तसे देखील नाही आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या टेस्ट स्कॉडमध्ये देखील त्याचे नाव नाही आहे. मग हा नेमका कोणता डेब्यू होतो आहे, असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडलाय.
Made my Test debut in India against Australia...
Well...It's happening again! #Excited #INDvAUS— DK (@DineshKarthik) February 2, 2023
कार्तिकने (Dinesh Karthik) पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पदार्पण केल्याची चर्चा आहे. मात्र तुम्हाला सांगतो की, दिनेश कार्तिकने हे ट्विट बॉर्डर-गावस्कर कसोटी (Border-Gavaskar Trophy) मालिकेदरम्यान कसोटीतून कॉमेंट्रीमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती देण्यासाठी केले आहे, ज्यासाठी तो खूप उत्साही असल्याचेही सांगत आहे. आतापर्यंत कार्तिकने असे केले नव्हते, म्हणून त्याने टेस्टमध्ये डेब्यू करत असल्याचे मिश्किलपणे म्हटले आहे.
9-13 फेब्रुवारी: पहिली कसोटी, नागपूर
17-21फेब्रुवारी: दुसरी कसोटी, दिल्ली
1-5 मार्च: तिसरी कसोटी, धर्मशाला
9-13 मार्च: चौथी कसोटी, अहमदाबाद
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि सूर्यकुमार यादव