Virat kohli Chole Bhature: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्या दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या सामन्याच्या (IND vs AUS, 2nd Test) पहिल्या डावात विराटला (Virat Kohli) चुकीच्या पद्धतीने आऊट देण्यात आलं, असा आरोप करण्यात येतोय. विराट आऊट (Virat Kohli OUT) झाल्यावर तो रागाने लालबुंद झाला होता. विराटचा संताप भर सामन्यात पहायला मिळाला. मात्र, विराटसमोर छोले भटुरे (Chole Bhature) आले अन् विराटच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण पेरले गेले. विराटची फेवरेट डिश म्हणे छोले भटुरे... त्यासाठी विराट आपला डाएट प्लॅन देखील मोडू शकतो.
छोले भटुरे पाहताच कोहली अगदी एका लहान बाळासारखा खूश (Virat Kohli’s reaction) होताना दिसतोय. दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय. विराटसाठी मागवले गेलेले हे छोले भटुरे कुठले होते माहितीये का? तर हे छोले भटुरे होते. दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये रामचं दुकानतील.
विराट कोहलीला छोले भटुरे खूप आवडतात, तेही दिल्लीमधील छोले भटुरे. विराट कोहली हा फक्त दिल्लीचा रहिवासी असल्याने तो गल्लोगल्ली फिरला आहे. त्याला छोले भटुरे इतकं आवडतं की तो त्यासाठी आपला डाएट प्लॅन देखील मोडू शकतो. दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये रामचं दुकान आहे, तिथले छोले भटुरे खूप प्रसिद्ध आहेत. विराटला राजौरी गार्डनचे छोले भटुरे (virat kohli favourite chole bhature) खुप आवडतात. या छोले भटुरेंसाठी विराट त्याचा डाएट प्लॅन (Rajouri Garden) देखील मोडू शकतो.
वादग्रस्त बाद निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये 'ते' पार्सल येताच झाला खूश.. विडिओ झाला व्हायरल..
— this is why i love cricket (@whyilovecricket) February 18, 2023
विराट पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि कुटुंबासह मुंबईत राहतो. काही दिवसांपूर्वी, मुंबईत असल्याने विराटला दिल्लीतील छोले भटुरे आठवले होते. मग काय विराटने अनुष्कासमोर हट्ट धरला. अनुष्काने आपल्या लाडक्या नवऱ्याची इच्छा पुर्ण करण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी तिला मुंबईत दिल्लीसारखे स्वादिष्ट छोले भटुरे मिळाले. मात्र, राजौरी गार्डनच्या छोले भटुरेची मजा वेगळी असं विराट म्हणतो.
@imVkohli and his endless love for Chole - Bhature pic.twitter.com/k3P3D5oYMw
— virushka.xx (@LoveVirushka) June 6, 2020
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 113 डावांवर गुंडाळल्यानंतर आता भारताचा विजयासाठी 115 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 1 रनची लीड घेतली होती. त्यानंतर आता भारत हा सामना जिंकेल, अशी अपेक्षा आहे. अशातच नुकत्याच आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या डावात भारताने 1 विकेटच्या बदल्यात 38 धावा केल्या आहेत.