BAN vs IND: बांगलादेश विरूद्ध भारत (BAN vs IND) यांच्यामध्ये उद्या तिसरी वनडे (IND vs BAN 3rd Odi) खेळवली जाणार आहे. ही शेवटची वनडे असून टीम इंडियाने सिरीज मात्र गमावली आहे. पहिल्या 2 वनडे जिंकून बांगलादेशच्या खेळाडूंनी सिरीज आपल्या नावे केली आहे. तर तिसरी वनडे जिंकून टीम इंडियाला क्लिन स्विप देण्याचा विचार बांगलादेशची टीम करतेय. मात्र ग्राऊंडवर हवामान कसं असणार आहे, यावर आपण नजर टाकूया.
उद्याच्या सामन्यात पाऊस करणार खेळ?
बांगलादेश आणि भारत यांच्यामध्य तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळवला जाणार आहे. शेर-ए-बांगला स्टेडियमवर सामना होणार असून इथलं वातावरणं थंड असणार आहे. आकाशात हलके ढग असतील मात्र जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश दिसणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार साडेअकरा वाजता सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये पावसाची शक्यता नाहीये.
सामन्याच्या दिवशी मीरपूरचं किमान तापमान 9 अंश सेल्सिअस आणि सर्वोच्च तापमान 23 अंश सेल्सिअस राहणार आहे. आर्द्रता 59 टक्के असू शकते. याशिवाय ताशी 8 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
Weather.com ने दिलेल्या माहितीनुसार, 10 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात बांगलादेश-भारत या अखेरच्या सामन्याची मजा पावसामुळे खराब होऊ शकते.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), दीपक चाहर (Deepak Chahar) आणि 26 वर्षी वेगवान गोलंदाज कुलदीप सेन (Kuldeep Sen) हे तीन खेळाडू संघातून दुखापतीमुळं बाहेर झाले आहे. रोहितच्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, दीपक चाहरसुद्धा हॅमस्ट्रींगच्या त्रासामुळं संघाबाहेर आहे. कुलदीप सेन पाठीच्या दुखण्यानं त्रस्त असल्यामुळं तोसुद्धा संघात योगदान देऊ शकलेला नाही.
रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी एका नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. के.एल. राहुल याच्या खांद्यावर संघाची धुरा असणार आहे. त्यामुळं स्वत:चा खेळ सावरण्यासोबतच संघाला योग्य दिशा देणं असं दुहेरी आव्हान त्याच्यापुढे असणार आहे. तसं पाहिलं तर, त्यानं आतापर्यंत 1 कसोटी सामना, 6 एकदिवसीय सामने आणि एका टी20 सामन्याचं कर्णधारपद भूषवलं आहे. बांगलादेशविरोधातील तिसरा कसोटी सामना आता फक्त औपचारिकतेपुरताच असला तरीही, यामध्ये के.एल त्याच्या वाट्याचा आलेली जबाबदारी कशी पार पाडतो हे सुद्धा भविष्याच्या दृष्टीनं लक्षवेधी ठरणार आहे.