मुंबई : उद्यापासून भारत आणि बांग्लादेश दरम्यान दुसरी टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रंगणारी ही टेस्ट डे नाईट खेळवली जाणार आहे. भारतात पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय. ही पिंक बॉल टेस्टमॅच आमच्या साठी आव्हानात्मक असल्याचं सांगताना या मॅचसाठी आम्ही उत्सूक असून ही मॅच एक मैलाचा दगड ठरू शकते , असं मत टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहलीनं व्यक्त केलं आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि शेवटचा सामना २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे. हा सामना डे-नाईट असणार आहे. हा सामना सगळ्यांसाठीच ऐतिहासिक असणार आहे कारण, गुलाबी रंगाच्या बॉलने हा सामना खेळला जाणार आहे. विराट आणि टीम ही टेस्ट जिंकून क्लीन स्वीप करण्याच्या विचारात असेल. टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे या सामन्यातही भारताच्या विजयाची शक्यता आहे. पण विराटच्या खेळीकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहलीने पहिल्या इनिंगमध्ये शुन्यावर आऊट झाला. १० वेळा तो टेस्ट क्रिकेटमध्ये शुन्यावर आऊट झाला आहे. पण शेवटच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.