आर.अश्विनचे या मैदानात विराट पेक्षा अधिक रन

पिंक बॉल टेस्ट मॅचमध्ये विराट चांगली कामगिरी करणार?

Updated: Nov 21, 2019, 12:57 PM IST
आर.अश्विनचे या मैदानात विराट पेक्षा अधिक रन

कोलकाता : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि शेवटचा सामना २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे. हा सामना डे-नाईट असणार आहे. हा सामना सगळ्यांसाठीच ऐतिहासिक असणार आहे कारण, गुलाबी रंगाच्या बॉलने हा सामना खेळला जाणार आहे. विराट आणि टीम ही टेस्ट जिंकून क्लीन स्वीप करण्याच्या विचारात असेल. टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे या सामन्यातही भारताच्या विजयाची शक्यता आहे. पण विराटच्या खेळीकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
 
भारतीय टीमच्या कर्णधार आणि जगभरात रन मशीन म्हणून प्रसिद्ध झालेल्या विराट कोहलीने जगभरात आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केलं आहे. पण जेव्हा ईडन गार्डनवर विराटची कामगिरी पाहिली तर विराट या ठिकाणी अपयशी ठरलेला दिसतो. विराटने ईडन गार्डनवर टेस्ट फॉरमॅटमध्ये 31.16 च्या रनरेटने रन केले आहेत. कोहलीने या मैदानात एकूण चार सामने खेळले आहे. या ४ सामन्यात त्याने फक्त १८७ रन केले आहेत.

७ इनिंगमध्ये ४ वेळा फ्लॉप

विराटने कोलकातामध्ये चार सामन्यांमध्ये ७ इनिंग खेळल्या आहेत. ज्यामध्ये ४ वेळा तो फ्लॉप ठरला. एका इनिंगमध्ये त्याने २० आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने ४५ रन केले होते. २०१७ मध्ये खेळलेल्या शेवटच्या सामन्यात विराटने नाबाद १०७ रन केले होते. हा एकच सामना त्यांच्यासाठी चांगला ठरला होता.

ईडन गार्डनवर सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत विराट ३३ व्या स्थानी आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण येथे सर्वाधिक १० सामन्यांमध्ये १२१७ रन केले आहेत. ज्यामध्ये पाच शतक आणि 3 अर्धशतक आहेत. विराटला लक्ष्मणचा रेकॉर्डला मोडायला वेळ लागेल. या मैदानात आर अश्विनने विराट पेक्षा अधिक रन केले आहेत.

भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहलीने पहिल्या इनिंगमध्ये शुन्यावर आऊट झाला. १० वेळा तो टेस्ट क्रिकेटमध्ये शुन्यावर आऊट झाला आहे.