Ind vs Eng : ध्रुव जुरैल निघाला धोनीपेक्षा 'शहाणा', कुलदीपच्या जाळ्यात असा अडकला पोप, पाहा Video

Ollie Pope Wicket Video : टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या ओली पोपची विकेट कुलदीपने (Kuldeep yadav) काढली. मात्र, त्यामागे ध्रुव जुरैलने (Dhruv Jurel) कसा प्लॅन आखला, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 7, 2024, 04:56 PM IST
Ind vs Eng : ध्रुव जुरैल निघाला धोनीपेक्षा 'शहाणा', कुलदीपच्या जाळ्यात असा अडकला पोप, पाहा Video title=
Ollie Pope Stump Wicket, Kuldeep yadav, Dhruv Jurel

Dhruv Jurel stumped Ollie Pope : भारत आणि इंग्लंड याच्यात आजपासून पाचव्या कसोटीला धर्मशाला स्टेडिअमध्ये (Dharmashala) सुरु झाला आहे. टॉस जिंकून इंग्लंडने पहिली फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या हा निर्णय टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि आर आश्विनने (R Ashwin) पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांचा समाचार घेतला अन् इंग्लंडला 218 धावांवर लोळवलं. कुलदीप यादवने पंजा खोलला अन् पहिला दिवस टीम इंडियाच्या पारड्यात टाकला. मात्र, कुलदीपने घेतलेल्या ओली पोपच्या विकेट्सची (Ollie Pope Wicket) सध्या जोरदार चर्चा आहे. विकेटकिपर ध्रुव जुरैलने कसा माईंड गेम खेळला? पाहुया... 

नेमकं काय झालं?

झालं असं की, कुलदीप यादव एकामागून एक ओव्हर पूर्ण करत होता. त्याने एका एन्डने गोलंदाजीची मारा चालू ठेवला. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज अडचणीत येत होते. बेन डकेटला तंबूत पाठवल्यानंतर झॅक क्रॉली कुलदीपच्या निशाण्यावर होता. मात्र, त्याने संयमी खेळी केल्याने कुलदीपने उपकर्णधार ओली पोप याला टार्गेट करायचं ठरवलं. इंग्लंडच्या 26 व्या ओव्हरला कुलदीप पोपला ऑफ स्पिनचा मारा सुरू केला. त्यामुळे पोप काहीसा गडबडला होता. त्याचवेळी विकेटकिपिंग करणारा ध्रुव जुरैल पोपच्या हालचालीवर नजर ठेऊन होता.

पोप पुढं येऊन खेळणार याचा अंदाज ध्रुवला आला. त्याने कुलदीप यादवला सांकेतिक भाषेत पोपचा डावपेच सांगितला. कुलदीप पोपचा डाव ओळखला अन् जाळं टाकलं. एक आत येणारा बॉल कुलदीपने टाकला अन् त्यावर पोपने पुढे येऊन बॉलला हवेत उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागे ध्रुव घारीसारखी नजर ठेऊन उभा होता. बॉल जसा पोपच्या बॅटमधून हुकला ध्रुवने आपलं काम केलं. ध्रुवने पोपच्या दांड्या गुल केल्या अन् भारताला दुसरी मोठी विकेट मिळाली.

पाहा Video

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.