Ind Vs Eng : इंग्लंड संघाला मोठा धक्का, वन डे सीरिजमध्ये हा गोलंदाज खेळणार नाही

इंग्लंडचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखपत झाल्यानं वन डे सीरिज खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. 

Updated: Mar 21, 2021, 03:36 PM IST
Ind Vs Eng : इंग्लंड संघाला मोठा धक्का, वन डे सीरिजमध्ये हा गोलंदाज खेळणार नाही title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी त्यानंतर टी 20 दोन्ही सीरिज यशस्वीपणे जिंकल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती वन डे सीरिजची. इंग्लंड विरुद्ध 23 मार्चपासून 3 सामन्यांची वन डे सीरिज होणार आहे. त्याआधी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखपत झाल्यानं वन डे सीरिज खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. 

इंग्लंड संघाचा कर्णधार इयोन मॉर्गन याने यासंदर्भात माहिती दिली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला झालेली दुखापत जास्त वाढली आहे. त्यामुळे त्याला वन डे सीरिज आणि IPL मधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. 25 वर्षीय जोफ्रा आर्चरच्या उजव्या कोपराला झालेली दुखापत वाढत असल्यानं इंग्लंडचंही टेन्शन वाढत आहे. 

मॉर्गननं जोफ्रा आर्चर खेळण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं आहे. शनिवारी पाचव्या आणि अंतिम टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर मॉर्गन म्हणाला की, आर्चर सध्या वन डे सीरिजमध्ये खेळेल की नाही याची शाश्वती देऊ शकत नाही. सध्या त्याची स्थिती खराब आहे. त्यामुळे त्याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला थांबावे लागेल. त्याची दुखापत सातत्याने वाढत जात आहे आणि त्याच्यावर उपचार करणे अत्यावश्यक आहे. 

आयपीएल 9 एप्रिलपासून सुरू होईल आणि राजस्थान रॉयल्सकडून देखील हा वेगवान गोलंदाज खेळणार होता. मात्र आता दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने खेळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 

Tags: