Ind vs Eng: भुवीच्या गुगलीवर इंग्लंडचा फलंदाज 'बोल्ड', मैदानाबाहेर असा काढला राग, व्हिडीओ

...आणि इंग्लंडच्या फलंदाजानं जोरात बॅट आपटली, पाहा नेमकं काय घडलं, व्हिडीओ

Updated: Mar 21, 2021, 03:06 PM IST
Ind vs Eng: भुवीच्या गुगलीवर इंग्लंडचा फलंदाज 'बोल्ड', मैदानाबाहेर असा काढला राग, व्हिडीओ  title=

अहमदाबाद: इंग्लंड विरुद्ध टी 20 मालिकेत 3-1नं मालिका जिंकण्यात भारतीय संघाला मोठं यश आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भागीदारी फलंदाजीनं मैदानात तुफान आणलं तर भारतीय संघातील गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणलं. 

भुवनेश्वर कुमार तर शेवटच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला. त्याच्या गोलंदाजीनं कमाल केली.भुवनेश्वर कुमारने डावाच्या दुसर्‍या बॉलवर इंग्लिश सलामीवीर जेसन रॉयला क्लीन बोल्ड केलं. स्विंग गोलंदाजीत तरबेज असलेल्या भुवनेश्वर कुमारने आपल्या गुगलीनं जेसन रॉयला त्याच्या इनस्विन्गर बॉलवर असंकाही बोल्ड केलं की सर्वजण पाहातच राहिले. 

दुसरीकडे जेसन रॉयला नेमकं काय घडलं हे कळेपर्यंत तो आऊट झाला हे लक्षात आलं. आपला राग काढण्यासाठी तो मैदानाबाहेर पडला आणि खाली बॅट आपटत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

भुवनेश्वर कुमारच्या या गुगली बॉलसमोर जेसन रॉयकडे उत्तर नव्हते आणि त्याला शून्याच्या स्कोरवर तंबूत परतावे लागले. जेसन रॉय अतिशय संतापलेले दिसला आणि त्याने आपला राग पाण्याच्या बाटलीवर काढला. जेसन रॉय डगआऊटकडे गेला आणि तेथील पाण्याच्या बाटलीवर जोरात बॅट आदळली. जेसन रॉयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.