T-20 World Cup : सेमी फायनलआधीच इंग्लंडच्या 2 विकेट्स? विराट-रोहितसाठीही आनंदाची बातमी!

सेमी फायनलआधी इंग्लंडला धक्क्यावर धक्के, दुसरा खेळाडू बाहेर!  

Updated: Nov 8, 2022, 09:19 PM IST
 T-20 World Cup : सेमी फायनलआधीच इंग्लंडच्या 2 विकेट्स? विराट-रोहितसाठीही आनंदाची बातमी! title=

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंडमध्ये येत्या गुरूवारी टी-20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य फेरीचा (T20 World Cup 2022 Semi Final) सामना होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. गुरूवारच्या सामन्याआधी इंग्लंडला दुसरा धक्का बसण्याची शक्यता  आहे. इंग्लंड संघाचा आणखी एक खेळाडू जखमी झाला आहे. (Ind vs Eng T20 World Cup 2022 Englands second player injured before T20 World Cup Sport marathi news)

इंग्लंडचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान (Devid malan) आधीच दुखापतग्रस्त असून आता वेगवान गोलंदाज मार्क वूडही दुखपतीने त्रस्त असल्याची माहिती समजत आहे. मार्क वूडचे मांसपेशी ताणले गेल्याने तो सराव सत्रातही सहभागी झाला नव्हता. त्यामुळे गुरूवारी खेळण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

मार्क वूड हा भारताचे महत्त्वाचे खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी डोकेदुखी ठरतो. त्यामुळे जर तो उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये खेळला नाहीतर भारतासह त्यांनाही मोठा दिलासा मिळेल. मार्क वूडने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. 154.74kph वेगाने चेंडू टाकत तो विश्वचषकातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, या स्पर्धेत वूडने आतापर्यंत 4 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. वर्ल्ड कपआधी त्याच्या दोन शस्त्रक्रियाही पार पडल्या होत्या. त्या शस्त्रक्रियेमुळे त्याला कित्येक दिवस क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं. वूड सामन्यामध्ये खेळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.