Ind vs Eng: मोटेरा स्टेडिअममध्ये आर अश्विनची वाट बघतोय हा मोठा रेकॉर्ड

भारत विरुद्ध इंग्लंड ( IND VS ENG) कसोटीतील तिसरा सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअमवर २४ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

Updated: Feb 23, 2021, 05:51 PM IST
Ind vs Eng: मोटेरा स्टेडिअममध्ये आर अश्विनची वाट बघतोय हा मोठा रेकॉर्ड title=

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड ( IND VS ENG) कसोटीतील तिसरा सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअमवर २४ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. याआधी झालेल्या दोन कसोटी सामन्यात दोन्ही संघाने १-१ सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२७ धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने पलटवार करत ३१७ धावाने विजय मिळवला. या विजय़ाचा शिल्पकार आलराऊंडर आर. अश्विनसमोर इंग्लंडच्या संघाने अक्षरश: गुडघे टेकले. तिसऱ्या कसोटी दरम्यान आर.अश्विनकडे ४०० टेस्ट विकेट घेण्याची संधी आहे.

७६ टेस्टमध्ये ३९४ विकेट

भारतीय संघातील ऑलराऊंडर रविचंद्रन अश्विन( Ravichandran ashwin)याने भारतासाठी ७६ टे्स्ट खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत ३९४ विकेट घेतले आहेत. आता मोटेरा स्टेडिअमवर होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात आर. अश्विनने ६ विकेट घेतले तर सर्वात जलद ४०० विकेट घेणारा तो भारतीय खेळाडू बनू शकतो. या आधी हा रेकॉर्ड भारताचा दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे( anil kumble)च्या नावावर आहे. त्याने ८५ टेस्ट मॅचमध्ये ४०० विकेट घेतले आहे. 

हेडली-स्टेनला टाकू शकतो मागे

भारतीय क्रिकेटर रविचंद्रन अश्विन(Ravichandran ashwin)कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४०० विकेटचा रेकॉर्ड करत न्यूजीलंडचा दिग्गज रिचड हेडली आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेल स्टेनला मागे टाकू शकतो.  स्टेन आणि हेडलीने ८० टेस्टमध्ये ४०० विकेट घेतल्या आहेत. तर कसोटीमध्ये आर. अश्विनकडे या दोन्ही महान गोलंदाज मागे टाकण्याती संधी आहे. 

मुरलीधरनच्या नावावर रेकॉर्ड

क्रिकेटमध्ये सर्वात कमी टेस्ट सामन्यात ४०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड हा श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ७२ टे्स्ट मॅचमध्ये ४०० विकेट घेतल्या आहेत.