मुंबई: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामना घरच्या मैदानावर होणार आहे. संध्याकाळी 7.00 वाजता जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड संघाला दोन मोठे धक्के मिळाले आहेत. केन विल्यमसन आणि काइल जेमिनसन टी 20 मधून बाहेर झाले आहेत.
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभूत करणाऱ्या न्यूझीलंडने आता कसोटी आणि टी 20 सीरिजसाठीही मास्टर प्लॅन तयार केला आहे. न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टीमधील सर्व खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.
काही खेळाडू टी 20 सीरिज तर काही खेळाडू कसोटी सीरिजमध्ये खेळतील. तर दोन्हीकडे काही खेळाडू कायम राहणार आहेत. काइल जेमिनसनने देखील कसोटी सीरिजसाठी टी 20 सीरिजमधून बाहेर होण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाचाही खेळाडूंसाठी खास प्लॅन
टी 20 सीरिजमध्ये माजी कर्णधार कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांना या सीरिजसाठी स्थान देण्यात आलं नाही.
टी 20 सीरिजमध्ये रोहित शर्मा नेतृत्व टीम इंडियाचं करणार आहे. त्यामुळे या टी 20 सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. हा किवीचा मास्टर प्लॅन यशस्वी होऊ न देण्यासाठी रोहित शर्मा काय स्ट्रॅटजी आखणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया संभाव्य Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल.
न्यूझीलंड टीम संभाव्य Playing XI
मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, टिम सीफर्ट, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), मार्क चॅपमन, मिचेल सॅन्टनर, जेम्स नीशम, टिम साउथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेन्ट बोल्ट.
टीम इंडिया स्क्वाड
रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीप), के एल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, इशान किशन, व्यंकटेश अय्यर ऋतुराज गायकवाड.
न्यूझीलंड स्क्वाड
टिम साउथी (कर्णधार), टिम सीफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने.