Ind Vs Pak Live सामना मोबाईलवर विनामूल्य पाहू शकता; बघा कसं?

भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी असून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Updated: Oct 22, 2021, 01:03 PM IST
Ind Vs Pak Live सामना मोबाईलवर विनामूल्य पाहू शकता; बघा कसं?

मुंबई : टी-20 क्रिकेट वर्ल्डकप 2021 सुरूवात झाली आहे. वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून 14 नोव्हेंबरपर्यंत चालेल. यावर्षी टी-20 विश्वचषक 2021 आयपीएल 2021 नंतर होतेय. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी असून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे टीव्ही नाही आणि ते मोबाईलवर लाइव्ह अॅक्शन पाहण्याचा मार्ग शोधतायत. 

तुम्ही हे सामने डिस्ने+हॉटस्टारवर पाहू शकता. तर आज आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही टी -20 विश्वचषक विनामूल्य कसे पाहू शकाल.

ICC Men’s T20 World Cup 2021 बघण्यासाठी Jio Cricket Plans

499 रुपयांचा Jio रिचार्ज प्लान

डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, 3 जीबी डेटा/दिवस + 6 जीबी अतिरिक्त डेटा, मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्ससाठी एक्सेस आहे. रिचार्ज प्लानची वैधता 28 दिवस आहे.

666 रुपयांचा Jio रिचार्ज प्लान

डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, 2 जीबी डेटा/दिवस, मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्ससाठी एक्सेस आहे. रिचार्ज प्लानची वैधता 56 दिवस आहे.

888 रुपये का Jio रिचार्ज प्लान

डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, 2 जीबी डेटा/दिवस + 5 जीबी अतिरिक्त डेटा, मोफत व्हॉईस कॉल, प्रतिदिन 100 एसएमएस आणि जिओ अॅप्ससाठी एक्सेस आहे. रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 84 दिवस आहे.

T20 World Cup 2021 साठी Airtelचा प्रीपेड प्लान

जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल, तर तुम्ही टी-20 विश्वचषक 2021चे सामनेही विनामूल्य पाहू शकता कारण ऑपरेटर आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रीपेड योजना देत आहे. एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज 3GB डेटा, 28 दिवसांची वैधता, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि डिस्ने+हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. एअरटेलकडे 699 रुपयांचा प्लान देखील आहे, जिथे 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे आणि दररोज 2 जीबी 
डेटा दिला जातो. या व्यतिरिक्त, डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सदस्यता विनामूल्य उपलब्ध आहे.

T20 World Cup 2021साठी Vodafone-Ideaचा प्रिपेड प्लान

व्होडाफोन आयडिया देखील मागे नाही आणि डिस्ने+ होस्टार सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या प्रीपेड योजनांची ऑफर आहे. कंपनी 501 रुपये, 601 रुपये, 701 रुपये, 901 रुपये आणि 2595 रुपयांचे प्रीपेड प्लॅन ऑफर करते. जे डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन ऑफर करतात. 501 रुपयांच्या प्लानमध्ये 16GB अतिरिक्त डेटासह 3GB डेटा आणि 28 दिवसांची वैधता आहे.