PAK बॅटिंग कोचचं खळबळजनक वक्तव्य, टीम इंडियाच्या 'या' 2 खेळडूंचा पाकिस्तानी टीमला धोका

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी दोन भारतीय फलंदाज पाकिस्तानसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

Updated: Oct 22, 2021, 12:22 PM IST
PAK बॅटिंग कोचचं खळबळजनक वक्तव्य, टीम इंडियाच्या 'या' 2 खेळडूंचा पाकिस्तानी टीमला धोका title=

मुंबई : टीम इंडियाने आपले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. ज्यामुळे त्यांचे मनोबल सातव्या आसमानावर आहे. आता 24 ऑक्‍टोबरला भारताचा पाकिस्तानशी जबरदस्त सामना होईल, ज्यावर संपूर्ण जगाची नजर आहे. दोन्ही देशांचे प्रेक्षक या सामन्याबद्दल उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी दोन भारतीय फलंदाज पाकिस्तानसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. चला त्या फलंदाजांबद्दल जाणून घेऊया

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांनी म्हटले आहे की, 'मी भारतीय क्रिकेटला खूप जवळून पाहिले आहे. मी केएल राहुलला त्याच्या फॉर्ममध्ये आणि स्वत:वर मेहनत करताना  पाहिले आहे. त्यामुळे तो पाकिस्तानसाठी मोठा धोका आहे. मी त्याचा संघर्षही पाहिला आहे आणि तो टी -20 फॉरमॅटवर वर्चस्व गाजवत आहे. मी ऋषभ पंतलाही पाहिले आहे, तो आक्रमण गोलंदाजीचा कसा सामना करु शकतो हे देखील पाहिलं आहे. त्याला संधी मिळाली की, को त्याचे सामर्थ्य दाखवायला मागे पुढे पाहत नाही.

केएल राहुल

टीम इंडियाचा हा वेगवान सलामीवीर सध्याच्या टी 20 वर्ल्ड कपसाठी फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन्ही सराव सामन्यांमध्ये चमकदार खेळी केली आहे. जेव्हा तो स्वतःच्या लयमध्ये असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीचा सामोरं जाऊ शकतो. त्याने आयपीएल 2021 मध्ये 600 पेक्षा जास्त धावा केल्या. राहुल डावाच्या सुरुवातीलाच अतिशय आक्रमक खेळ दाखवतो. त्याला मैदानावर सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही.

ऋषभ पंत 

ऋषभ पंत हा एक उत्कृष्ट विकेटकीपर आहे. तसेच तो आक्रमक फलंदाजी देखील करतो, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. पंत एका हाताने सिक्सर मारण्यात देखील अत्यंत पटाईत आहे. जे बघून प्रेक्षक खूप रोमांचित होतात. डेथ ओव्हर्समध्ये तर त्याला थांबवणे सोपे नाही, जेव्हा तो त्यांच्या लयमध्ये येतो, तेव्हा तो त्याच्या खेळामुळे गोलंदाजांना देखील चकीत करतो. ज्यामुळे गोलंदाज याला कसा बॉल टाकायचा याच पेचात पडतात.

विराट कोहलीला देखील पंतकडून पाकिस्तानविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

टी -20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), इशान किशन (wk), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.
प्रशिक्षक: रवी शास्त्री.
मार्गदर्शक: एमएस धोनी.