'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल

IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 19, 2023, 10:52 PM IST
'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल title=
ind vs pak match A nail in my eye irfan pathan shared bad experience of playing in pakistan

Irfan Pathan in Pakistan : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव झाला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठलाही सामना असो तो हायव्होल्टेज सामना असतो. जेव्हा जेव्हा पाकिस्तानचा पराभव झाला त्यानंतर पाक टीम कायम रडचा डाव खेळते. (ind vs pak match A nail in my eye irfan pathan shared bad experience of playing in pakistan)

पाकिस्तानचा रडीचा डाव!

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक सामना 14 ऑक्टोबरला रंगला होता. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक क्रिकेटप्रेमींनी हजेरी लावली होती. त्यात पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींची संख्या होती.

पण या सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवान आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना प्रेक्षकांच्या एका गटाने धार्मिक घोषणा दिल्या. याबद्दल पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे म्हणजे आयसीसीकडे तक्रारही केली आहे. पाकिस्तानचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर यांनीही म्हटलं आहे की, भारताविरुद्धच्या 7 विकेटने पराभवाच्या वेळी प्रेक्षकांच्या आवाजामुळे त्यांचे खेळाडू त्रस्त झाले होते. अशातच टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने खळबळजनक आरोप केलाय.

हेसुद्धा वाचा - IND vs BAN : रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं, पण एकामागोमाग तोडले अनेक रेकॉर्ड

'माझ्या डोळ्यात एक खिळा...'

इरफानने सांगितलं की, आम्ही पेशावरला खेळत असताना पाकिस्तानच्या एका चाहत्याने माझ्या दिशेने एक खिळा फेकला. त्यावेळी मी थोडक्यात बचावलो. माझ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असती. पण आम्ही या गोष्टीचा बाऊपण केला नाही. माझा डोळाही यात मी गमावला असता. आम्ही 10 मिनिटं थांबलो आणि परत खेळायला लागलो. कारण त्या मॅचमध्ये आम्ही चांगले खेळत होतो. त्यामुळे पाकिस्तान संघानेही भारतीय चाहत्यांच्या कृत्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या खेळाकडे लक्ष द्यावे. 

ही घटना 2004 मधील आहे, ज्यावेळी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये दौऱ्यासाठी गेला होता. इरफान पठाण हा वर्ल्डकपसाठीच्या हिंदी कॉमेंट्री टीमचं समालोचन करतो. त्यावेळी त्याने ही धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला.