रांची : टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसरा वनडे सामना उद्या शनिवारी रांची येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्याच्या सामन्यावर हवामानाचा अंदाज काय आहे ते जाणून घेऊयात. (ind Vs sa 2nd odi match ranchi weather report rain forecast pitch report jsca international stadium ranchi team india south africa shikhar dhawan temba bavuma)
टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिकेत (South Africa) लखनऊमध्ये पहिला वनडे सामना पार पडला होता. या सामन्यावर दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. या सामन्याचा पावसाने अनेकदा खोळंबा केला होता. पावसामुळे दोन-तीन वेळा टॉस लांबला होता. त्यामुळे सामना 40-40 ओव्हरचा करण्यात आला होता. अशीच परिस्थिती रांचीतल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही असण्याची शक्यता आहे. कारण या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे.
हवामानाचा अंदाज काय?
रांचीत रविवारी रंगणाऱ्या (Ind Vs Sa) दुसऱ्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता आहे. या मैदानावर दिवसा हवामान स्वच्छ राहील, परंतु संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता वाढण्याची माहिती आहे. Weather.Com नुसार, रविवारी रांचीमध्ये 25 टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अधूनमधून पाऊस पडत असेल तर तो सामन्यात अडथळा ठरू शकतो.
दरम्यान तीन वनडे सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका (South Africa) 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या वनडे सामन्य़ात कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली सामन्यात पुनरागमन करण्याच्या इराद्याने टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. टीम इंडियासाठी (Team India) हा 'करो या मरो'चा सामना असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्य़ात विजय मिळवते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेट किपर), संजू सॅमसन (विकेट किपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर
दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, जानेमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, वेन पारनेल, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा,तबरेझ शम्सी.