मुंबई : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 जूनपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होतेय. केएल राहुल या सीरिजमध्ये टीम इंडियाचं सारथ्य करणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे. या क्रिकेटरने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) धमाकेदार कामगिरी केली. (ind vs sa t 20i series rishbha pant may missed 1st match due to dinesh karthik)
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेतून दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) टीममध्ये एन्ट्री झाली. कार्तिकने आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 16 सामन्यात 55 च्या सरासरीने 330 धावा कुटल्या.
कार्तिकचं 3 वर्षांनी संघात पुनरागमन झालंय. करिअर संपल्याचं म्हटलं जात असतानाच कार्तिकने संघात कमबॅक करत आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय.
कार्तिकचा सध्याचा खेळ पाहता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात संधी मिळू शकते. अशा स्थितीत ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये पंतला तितकेसे यश मिळालेले नाही. अनेक सामन्यांमध्ये पंतच्या खराब फॉर्मचा फटका संघाला बसला आहे.
दुसरीकडे, कार्तिक विकेटकीपिंगमध्ये पंतपेक्षा सरस आहे. पंतने 2022 मध्ये केवळ 2 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ 60 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाला यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कार्तिकला T20 विश्वचषकासाठी संधी मिळू शकते, कारण कार्तिककडे अफाट अनुभव आहे, जो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.
केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.