K L Rahul | विराटने टीमबाहेर ठेवलेल्या खेळाडूला केएलने येताच खेळवलं

टीम इंडिया (Team India)  विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. 

Updated: Jan 19, 2022, 05:21 PM IST
K L Rahul | विराटने टीमबाहेर ठेवलेल्या खेळाडूला केएलने येताच खेळवलं  title=

पार्ल | टीम इंडिया (Team India)  विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमाने टॉस जिंकून टीम इंडियाला फिल्डिंगसाठी भाग पाडलं. या मालिकेत केएल राहुलने कर्णधार म्हणून पदार्पण केलं. केएलने या पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकी गोलंदाजाला संधी दिली. हा खेळाडू विराटच्या नेतृत्वात गेल्या 6 महिन्यांपासून टीमबाहेर होता. केएलने युजवेंद्र चहलला संधी दिली. यासह चहलने 6 महिन्यांनंतर टीममध्ये कमबॅक केलं. (ind vs sa team india vs south afriaca 1st odi match leg spinner yuzvendra chahal comes odi team after 6 months at boland park paarl) 

आऊट ऑफ फॉर्म  

युजवेंद्र चहलसाठी 2021 हे वर्ष निराशाजनक राहिलं. चहलला 2021 मध्ये तो ज्यासाठी ओळखला जातो, त्यानुसार त्याला कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चहलचा टी 20 वर्ल्ड कप टीममध्येही समावेश करण्यात आला नव्हता. चहलला टीममध्ये संधी मिळणं अवघड होऊन बसलं होतं, कारण राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती या दोघांना सातत्याने संधी दिली जात होती.  

मात्र या दोघांना सातत्याने धमाकेदार कामगिरी करता आली नाही. दोघेही फ्लॉप ठरले. त्यानंतर चहलला नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संधी देण्यात आली. त्यानतंर आता जानेवारी 2022 मध्ये चहलचं एकदिवसीय संघात पुनरागमन झालं आहे. चहलने अखेरचा वनडे सामना श्रीलंका विरुद्ध 20 जुलै 2021 ला खेळला होता.

चहलची वनडेमधील कामगिरी

चहलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. चहलने एकूण 57 सामन्यांमध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने यात 2 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. 

व्यंकटेश अय्यरचं पदार्पण
 
आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या सामन्यातून तोडफोड फलंदाज व्यंकटेश अय्यर एकदिवसीय पदार्पण केलं आहे. तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणार आहे. कॅप्टन केएल राहुल आणि 'गब्बर' शिखर धवन हे दोघे ओपनिंग करणार आहेत. आर अश्विन आणि चहल या दोघांवर फिरकीची जबाबदारी आहे.  

साऊथ आफ्रिका |  क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जेनेमन मालन, एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि तबरेझ शम्सी. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.