टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत मात, विराट ठरला 'मॅन ऑफ द मॅच'

शुक्रवारी झालेल्या सहा मॅचच्या सीरिजमधल्या सहाव्या आणि शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवलाय.   

Updated: Feb 16, 2018, 11:24 PM IST
टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत मात, विराट ठरला 'मॅन ऑफ द मॅच' title=

सेन्चुरियन : शुक्रवारी झालेल्या सहा मॅचच्या सीरिजमधल्या सहाव्या आणि शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवलाय.   

सेन्चुरियनमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय मिळवलाय. त्याचसोबतच भारतानं ही एकदिवसीय मालिका ५-१ अशा मोठ्या फरकानं जिंकलीय.

२०५ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय टीमनं ३२.१ ओव्हरमध्ये केवळ दोन विकेटच्या नुकसानीसहीत हा विजय मिळवलाय. 

या मॅचमध्ये झंझावाती शतक झळकावणारा टीम इंडियाचा कॅप्टन 'मॅन ऑफ द मॅच' ठरलाय. या सीरिजमधलं विराटचं हे तिसरं शतक ठरलं... तर वन डे करिअरमधलं हे त्याचं ३५ वं शतक ठरलंय. त्यानं ८२ बॉल्समध्ये शतक साध्य केलं. तो शेवटपर्यंत १२९ रन्सवर नाबाद राहीला तर रहाणेनं ३४ रन्स ठोकले. 

तर, या सीरिजमध्ये पहिलीच मॅच खेळत असलेल्या शार्दुल ठाकूरनं ८.५ ओव्हरमध्ये चार विकेट घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलनं २-२ विकेट पटकावले. त्यामुळे, विराट आणि शार्दुलला या मॅचच्या विजयाचे शिल्पकार म्हटलं जातंय. 

भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली. अगोदरपासूनच पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमची मजल केवळ २०४ रन्सवर जाऊ शकली. खाया जोडीनं ५४ रन्स केले. परंतु, इतर कोणताही बॅटसमन मैदानावर जास्त काळ टिकू शकला नाही.