Mayank Agarwal | भारतात धमाकेदार बॅटिंग करणारा मयंक परदेशात मात्र अपयशी, 14 डावांमध्ये एकच अर्धशतक

काही अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी केली.  

Updated: Jan 14, 2022, 04:54 PM IST
Mayank Agarwal | भारतात धमाकेदार बॅटिंग करणारा मयंक परदेशात मात्र अपयशी, 14 डावांमध्ये एकच अर्धशतक

मुंबई : काही अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी पुन्हा अपयशी ठरली. या दोघांव्यतिरिक्त असाही एक फलंदाज आहे, जो सातत्याने परदेशात निराशाजक कामगिरी करतोय. मंयक अग्रवाल (Mayank Agarwal), भारतात धमाकेदार बॅटिंग करणारा मयंक परदेशात मात्र अपयशी ठरलाय. यामुळेच त्याला हटवण्याची मागणी केली जात आहे. (ind vs sa test series team india opener mayank agarwal flop last 14 away test innigs scored only one fifty)

आफ्रिकेत केवळ एक अर्धशतक

मयंकने आफ्रिका विरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 6 डावांमध्ये 22.50 च्या सरासरीने केवळ 135 धावाच केल्या. या दरम्यान त्याचा 60 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. मयंकने सेंचुरियनमध्ये 60 धावांची खेळी केली होती. 

मंयक परदेशात फ्लॉप

मयंकने परदेशात खेळलेल्या 14 डावांमध्ये फक्त 213 धावाच केल्या आहेत. यामध्ये फक्त 1 अर्धशतक लगावलं आहे. हे अर्धशतकही सेंच्युरियनमध्ये लगावलेलं आहे. मात्र त्याची आकडेवारी हैराण करणारी आहे. दुसऱ्या बाजूला मयंकने भारतात धमाकेदार कामगिरी केली आहे. 

मंयकचा भारतात धमाका

मंयकने 2019-2021 या 2 वर्षांमध्ये भारतात 7 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 57.19 च्या कमाल सरासरीने 839 धावा चोपल्या. यामध्ये 4 शतक आणि 1 अर्धशतकांचा समावेश आहे. मयंकची 243 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. 

मोठ्या काळानंतर कमबॅक

मयंकला डिसेंबर 2021 मध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियात कमबॅक करण्याची संधी मिळाली. मयंकने या संधीचं सोनं केलं. मयंकने मुंबई आणि सेंचुरियनमध्ये 69 च्या सरासरीने 2 अर्धशतक आणि 1 शतकी खेळीच्या मदतीने 276 धावा केल्या. या खेळीमुळेच मयंकला आयसीसी प्लेअर ऑफ द मन्थ (Icc Player Of The Month Award) या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

खणखणीत शतक 

न्यूझीलंड विरुद्ध कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर टीम इंडियाने मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर 327 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मयंक या विजयाचा हिरो ठरला होता. मंयकने या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे 150 आणि 62 धावांची सरस खेळी केली होती.  

मयंकला आगामी दौऱ्यात संधी मिळणार?

मयंकचे भारतातील आकडे धमाकेदार आहेत. मात्र परदेशात त्याला चमक दाखवता आलेला नाही. त्यामुळे मयंकला आगामी दौऱ्यात संधी मिळणा की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.