Gautam Gambhir | "तु अपरिपक्व", विराटच्या त्या कृतीवरुन गंभीर संतापला, म्हणाला.....

 टीम इंडियाचा (Indian Cricket Team) माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पुन्हा एकदा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) तोफ डागली आहे. 

Updated: Jan 14, 2022, 03:22 PM IST
Gautam Gambhir | "तु अपरिपक्व", विराटच्या त्या कृतीवरुन गंभीर संतापला, म्हणाला..... title=

केपटाऊन : टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पुन्हा एकदा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) तोफ डागली आहे. विराटने आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (IND vs SA 3rd Test) केलेल्या कृतीमुळे गंभीरने त्याच्यारवर सडकून टीका केली आहे. डीआरएसवरुन या वादाला तोंड फुटलं. फक्त विराटच नाही, तर इतर खेळाडूंनीही दक्षिण आफ्रिकेच्या टीव्ही ब्रॉडकास्टवरही नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रकरणावरुन गंभीरने विराटला फैलावर घेतलंय. (ind vs sa 3rd test day 3 former team india cricketer gautam gambhir angry on test captain virat kohli over to give reaction on stump mike) 

गंभीर नक्की काय म्हणाला?

कोहली फार अपरिपक्व आहे. स्टंप्स माईकवर येऊन अशाप्रकारे प्रतिक्रिया देणं कोणत्याही भारतीय कर्णधारासाठी वाईट बाब आहे. अशा कृतीमुळे तुम्ही युवा खेळाडूंचे आदर्श होऊ शकत नाहीत", असं गंभीर म्हणाला. तो स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत होता.

नक्की मॅटर काय झाला? 

तिसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार घडला. आफ्रिकेची दुसऱ्या इनिंगमधील बॅटिंग सुरु होती. आश्विन दुसऱ्या डावातील 21 वी ओव्हर टाकायला आला. अश्विनने या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर कर्णधार डीन एल्गरला एलबीडबल्यू आऊट केलं. फिल्ड अंपायरने एल्गरला एलबीडब्ल्यू आऊट असल्याचं जाहीर केलं. यानंतर जे झालं त्याचा विचार कोणीच केला नसेल. 

एल्गरने अंपायरच्या या निर्णयाला आव्हान दिलं. एल्गरने डीआरएस रिव्हीव्यू घेतला. यानंतर रिप्ले दाखवण्यात आला. या रिप्लेमध्ये चेंडू स्टंपच्या रांगेत एल्गरच्या गुडघ्याखाली लागल्याचं दिसून आलं. साधारणपणे अशा स्थितीत एलबीडबल्यू आऊट होण्यापासून वाचणं जवळपास अशक्य असतं. मात्र बॉल ट्रॅकिंगनुसार, बॉल स्टंप्सच्या वरच्या दिशेने जात होता. यानंतर थर्ड अंपायर अल्लाउद्दीन पालेकरने एल्गरला नॉट आऊट असल्याचं जाहीर केलं.

यामुळे फिल्ड अंपायर  मारेस इरास्मस (Umpire Marais Erasmus) यांना आपला निर्णय बदलावा लागला. "हे अशक्य आहे", मारेस इरास्मस यांनी जेव्हा आपला निर्णय बदलला तेव्हा त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. या सामन्यात अल्लाउद्दीन पालेकर थर्ड अंपायर आहेत. कोरोनामुळे ज्या देशात मालिका खेळवण्यात येत आहेत, त्याच देशाचे अंपायर पंचाची भूमिका बजावत आहेत. 

अल्लाउद्दीनने नॉट आऊट असल्याचं जाहीर केल्याने विराटचा पारा वाढला. विराटने जमिनीवर पाय मारत (फुटबॉलला मारतो तसं) आपला राग व्यक्त केला. या सर्व प्रकारानंतर विराटने स्टंप माईकजवळ जावून आपला संताप व्यक्त केला. "संपूर्ण आफ्रिका टीम इंडियाच्या 11 खेळाडूंविरुद्ध खेळतोय", अशा शब्दांमध्ये विराटने आपला संताप व्यक्त केला. 

मग काय, विराटनंतर अश्विनही मागे राहिला नाही. अश्विनही स्टंप माईकवर आला. "तुम्हाला जिंकण्यासाठी अन्य मार्ग अवलंबावायला हवा सुपरस्पोर्ट्स", अशा शब्दांमध्ये अश्विनने आपला संताप व्यक्त केला.