Sanju Samson ruled Out T-20 Series : श्रीलंका आणि भारतामधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये भारताने पहिला सामना जिंकत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारत आणि श्रीलंकेमधील दुसरा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. मात्र दुसऱ्या सामन्याअगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार प्लेअर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. (Ind vs Sl indian player Sanju Samson ruled Out T20 Series latest marathi sport news)
भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसन दुखापतीमुळे सीरिजमुळे बाहेर (Sanju Samson ruled Out T-20 Series) झाला आहे. पहिल्या सामन्यामध्ये दवबिंदू पडल्याने फिल्डिंग करताना संजूचा पाय घसरला होता. संजू सॅमसन बॉल पकडताना गुडघ्याला दुखापत झाली होती. संजूला आधीच संधी मिळत नव्हती आता संधी मिळाली तर त्याला दुखापतीमुळे बाहेर बसावं लागणार आहे. संजूला पहिल्या टी-20 मध्ये मोठी खेळी करत आली नव्हती, केवळ 5 धावा करुन तो बाद झाला होता. संजूने एक कॅचही सोडला होता.
संजूच्या जागी युवा जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. जितेश शर्मा आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळलाय. आयपीएलमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याच्यासाठी टीम इंडियाची दारे उघडली आहे. जितेशने पंजाबकडून खेळताना फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली आहे.
NEWS - Sanju Samson ruled out of the remainder of T20I series.
The All-India Senior Selection Committee has named Jitesh Sharma as replacement for Sanju Samson.
More details here - https://t.co/0PMIjvONn6 #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 4, 2023
जितेश शर्माने आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून खेळताना 12 सामन्यांमध्ये 163. 64 स्ट्राईक रेटने 234 धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीत जितेन विदर्भासाठी खेळतो, जितेशला दुसऱ्या सामन्यात संधी मिळते की नाही याकडे खास करून विदर्भातील चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : हार्दिक पांड्या (कप्तान), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार