कोलकाता : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर (IND vs WI 2ND T20I) 8 धावांनी विजय मिळवला आहे. रोहितसेनाने विंडिजला विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले होते. मात्र विंडिजला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 178 धावाच करता आल्या. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे. मालिकेत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. (ind vs wi 2nd t 20i team india beat west indies by 8 runs and win series at eden garden kolkata)
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई.
वेस्ट इंडिजचे शिलेदार : किरॉन पोलार्ड (कर्णधार), ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड आणि शेल्डन कॉट्रेल.