IND vs WI: पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाचं असं असणार Playing 11!

टीम इंडियाने गेल्या 16 वर्षात वेस्ट इंडिजविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. 

Updated: Jul 22, 2022, 09:06 AM IST
IND vs WI: पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाचं असं असणार Playing 11! title=

त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे सिरीजतील पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाची कमान शिखर धवनच्या हाती असणार आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आलीये. टीम इंडियाने गेल्या 16 वर्षात वेस्ट इंडिजविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. 

हा रेकॉर्ड मोडणार नाही याची शिखर धवन देखील काळजी घेणार आहे. यावेळीही शिखर धवनला मालिका जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. अशा स्थितीत पहिल्या वनडे सामन्यात तो अनेक युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो. 

अशी असेल ओपनिंग जोडी

रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत इशान किशनला कर्णधार शिखर धवनसोबत सलामीची संधी मिळू शकते. इशान उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो विकेट्सच्या दरम्यान चांगली धावा करतो. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते.

मिडल ऑर्डरमध्ये हे खेळाडू पक्के

चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव उतरणार हे जवळपास निश्चित आहे. सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्ध झंझावाती शतक झळकावलं. सूर्यकुमारकडे अशी कला आहे की, तो अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचं पूर्ण रूप बदलू शकतो. 

दुसरीकडे संजू सॅमसनला पाचव्या क्रमांकावर यष्टिरक्षकाची जबाबदारी खेळण्यासाठी जागा दिली जाऊ शकते. संजूमध्ये मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे. सहाव्या क्रमांकासाठी दीपक हुडा यांना संधी मिळू शकते. हुड्डाने आयर्लंडच्या दौऱ्यावर खूप चांगला खेळ केला होता.

या गोलंदाजांचा असेल समावेश

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळू शकते. तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी कर्णधार शिखर धवन आयपीएलचा सुपरस्टार अर्शदीप सिंगचा करू शकतो. याशिवाय गोलंदाजासाठी शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांच्यापैकी एकाला स्थान मिळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचं संभाव्य प्लेईंग 11

शिखर धवन (कर्णधार), ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हु्ड्डा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह.