मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध उद्यापासून टी 20 सीरिजला सुरुवात होत आहे. वन डे सीरिजनंतर पुन्हा एकदा टी 20 सीरिजमध्ये व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. त्यासाठी रोहित शर्मा तगडी टीम घेऊन मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.
पहिल्या टी 20 साठी ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव सारखा धडाकेबाज फलंदाज असणार आहे. तर भुवीला टीममध्ये खेळण्याची संधी दिली जाणार आहे. आर अश्विन आणि अक्षर पटेलपैकी कोणाला टीममध्ये संधी दिली जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिल्या टी 20 सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शनही वाढलं आहे. के एल राहुल आणि रविंद्र जडेजा दोघंही पहिल्या टी 20 मधून बाहेर गेले आहेत. हे दोन्ही खेळाडू अजूनही अनफिट असल्याची माहिती मिळाली आहे.
पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत ओपनिंग जोडी उतरण्याची शक्यता आहे. हे दोन्ही फलंदाज वेगाने धावा करण्यात माहिर आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने 4 शतक झळकवले आहेत. पाचवं शतक कधी झळकवणार याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत.
रोहित शर्मा आणि गिल देखील ओपनिंगला उतरू शकतात. यावर आता उद्या अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. रविंद्र जडेजा टीममध्ये नसल्याचा टीमला फटका बसणार का हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर/ दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (WK), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक/रवींद्र जडेजा, आर अश्विन/ अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव