IND vs SA: राहाणेनं गमवलं रोहितनं कमवलं, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

या तीन स्टार खेळाडूंना दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मिळाली नाही संधी, तर रहाणेनंही गमवलं उपकर्णधारपद

Updated: Dec 8, 2021, 09:57 PM IST
IND vs SA: राहाणेनं गमवलं रोहितनं कमवलं, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. चार खेळाडूंना स्टँडबाय ठेवण्यात आलं आहे. 

रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांना न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. अजिंक्य राहाणेला आपलं उप-कर्णधारपद गमवावं लागलं. तर अजिंक्य रहाणे ऐवजी रोहित शर्माला कसोटी फॉरमॅटमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्याच्या जागी रोहित शर्माला उपकर्णधार म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य रहाणेची कामगिरी अत्यंत खराब आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहितला विश्रांती देण्यात आली होती. आता तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये मैदानात खेळताना दिसणार आहे. 

रोहित शर्माकडे वन डेच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियात 3 खेळाडूंना संधी देण्यात आली नाही. रविंद्र जडेजा, स्पिनर अक्षर पटेल आणि शुभमन गिल या तिन्ही खेळाडूंना दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे. 

हनुमा विहारीला कसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रोहित शर्मा शार्दुल ठाकुर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळताना दिसणार आहे. शमी आणि बुमराहची जोडी जमली तर टीम इंडियाला मोठा फायदा होऊ शकतो. 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अरजन नगवासवाला.