एडिलेट : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवा इतिहास रचलाय. या विजयानंतर भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीनेही या मालिकेत जलद हजार रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला. 59.05 च्या सरासरीने हजार रन्स करत त्याने सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मागे सोडलंय. या व्यतिरिक्तही भारताने असे काही इतिहास रचले आहेत ज्यांचं जगभरातून कौतूक होतंय.
Asian team beating Australia in Australia in Tests - last three occasions:
India, Adelaide, 2018*
India, Perth, 2008
India, Adelaide, 2003#AUSvIND— Umang Pabari (@UPStatsman) December 10, 2018
39 वर्षामध्ये कोणत्या आशियाई संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत हरवून सिरीजची सुरूवात केली नव्हती. आजच्या दिमाखदार विजयानंतर भारताने 1-0 अशी आघाडी घेत ही परंपरा मोडून काढली. याआधी 1979 मध्ये मेलबर्न मध्ये पाकिस्तानला हा कारनामा करता आला होता. त्यानंतर पाकिस्तानलाही असं करण जमलं नव्हतं.
Most catches taken in a Test:
35 - Australia v India, Adelaide, 2018*
34 - South Africa v Australia, Cape Town, 2018
33 - Australia v India, Perth, 1992#AUSvIND— Umang Pabari (@UPStatsman) December 10, 2018
कॅचेस विन मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे सर्वाधिक कॅच घेणाऱ्या संघ जिकंतो असं मानलं जातं. या सिरीजमध्ये दोन्ही संघानी आपल्या क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवली आणि एडिलेट मालिकेत एकूण 35 कॅच घेतल्या गेल्या. एका टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचाही हा स्वतंत्र रेकॉर्ड आहे. याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात एकूण 34 कॅच घेतल्या गेल्या होत्या. 1992 मध्ये पर्थच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात एकूण 33 कॅच घेतल्या गेल्या.
या कॅलेंडर वर्षात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिघांविरुद्धही टेस्ट मॅच जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ बनलाय.