मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. T20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आलीये. चाहत्यांसाठी फार धक्कादायक अशी ही बातमी आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC T20 वर्ल्डकप सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. मुख्य म्हणजे वर्ल्डकप सुरु होण्यासाठी अजूनही एक महिन्याचा अवधी बाकी आहे. मात्र तरीही या सामन्याची सर्व तिकिटं विकली गेली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी याबाबत माहिती दिलीये.
आयसीसीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय की, भारत आणि पाकिस्तान यांच्याच 23 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या सुपर 12 सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली आहेत. अतिरिक्त स्टँडिंग रूमची तिकीटं विक्रीसाठी उपलब्ध केली असता काही मिनिटांतच त्यांची विक्री झाली.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला एशिया कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकपमध्ये त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. अशात रविंद्र जडेजाच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी देण्यात यावी हा प्रश्नही निवड समितीसमोर आहे.