युझवेंद्र चहलची जबरदस्त बॉलिंग, भारताला फायनल जिंकण्यासाठी हव्या एवढ्या रन्स

टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये बांग्लादेशनं भारतापुढे विजयासाठी १६७ रन्सचं आव्हान दिलं आहे.

Updated: Mar 18, 2018, 08:57 PM IST
युझवेंद्र चहलची जबरदस्त बॉलिंग, भारताला फायनल जिंकण्यासाठी हव्या एवढ्या रन्स  title=

कोलंबो : टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये बांग्लादेशनं भारतापुढे विजयासाठी १६७ रन्सचं आव्हान दिलं आहे. २० ओव्हरमध्ये बांग्लादेशनं १६६/८ एवढा स्कोअर केला. भारताकडून युझवेंद्र चहलनं ४ ओव्हरमध्ये फक्त १८ रन्स देऊन ३ विकेट घेतल्या. तर जयदेव उनाडकटला २ विकेट आणि वॉशिंग्टन सुंदरला १ विकेट मिळाली. वॉशिंग्टन सुंदरनं ४ ओव्हरमध्ये फक्त २० रन्स दिल्या. पण विजय शंकरनं ४ ओव्हरमध्ये ४८ रन्स तर शार्दुल ठाकूरनं ४ ओव्हरमध्ये ४५ रन्स दिल्या. यामुळे बांग्लादेशला १६६ रन्सपर्यंत मजल मारता आली. बांग्लादेशकडून शब्बीर रहमाननं ५० बॉल्समध्ये सर्वाधिक ७७ रन्स केले. शब्बीर रहमानच्या खेळीमध्ये ७ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.

या सीरिजमध्ये भारतानं दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत ही सीरिज खेळतोय. पण तरीही या मॅचमध्ये भारताचंच पारडं जड आहे. आत्तापर्यंत भारत आणि बांग्लादेशमध्ये ७ टी-20 मॅच झाल्या आहेत. या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून विजयी गुढी उभारण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा