हेटमेयरचा शतकी तडाखा, वेस्ट इंडिजचं भारतापुढे ३२३ रनचं आव्हान

पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे ३२३ रनचं आव्हान ठेवलं आहे.

Updated: Oct 21, 2018, 05:34 PM IST
हेटमेयरचा शतकी तडाखा, वेस्ट इंडिजचं भारतापुढे ३२३ रनचं आव्हान title=

गुवाहाटी : पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे ३२३ रनचं आव्हान ठेवलं आहे. ५० ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजनं ८ विकेट गमावून ३२२ रन केले. वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमेयरचं शतक आणि ओपनर किरन पॉवेलच्या अर्धशतकामुळे वेस्ट इंडिजनं या धावसंख्येपर्यंत मजल मारली. शिमरोन हेटमेयरनं ७८ बॉलमध्ये १०६ रनची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ६ फोरचा समावेश होता. तर ओपनर किरन पॉवेलनं ३९ बॉलमध्ये ५१ रन केले. पॉवेलनं २ सिक्स आणि ६ फोर मारले.

सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं ३८, नवव्या क्रमांकाच्या बिशूनं नाबाद २२ आणि दहाव्या क्रमांक्चाय केमार रोचनं नाबाद २६ रन केले. तळाच्या या बॅट्समनमुळे वेस्ट इंडिजला सन्मानपूर्वक स्कोअरपर्यंत पोहोचता आलं.

भारताकडून लेग स्पिनर युझवेंद्र चहलनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला २-२ विकेट मिळवण्यात यश आलं. खलील अहमदला १ विकेट मिळाली.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा