मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं विजय झाला आहे. रोहित शर्मानं झळकावलेल्या द्विशतकामुळे भारतानं ५० ओव्हर्समध्ये ३९२ रन्स केले. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे तिसरं द्विशतक होतं. वनडे क्रिकेटमध्ये एवढी द्विशतक करणारा रोहित हा पहिला खेळाडू बनला आहे.
श्रीलंकेविरुद्ध केलेल्या ३९२ रन्सनंतर भारतानं वनडे क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे. वनडेमध्ये ३०० पेक्षा जास्त स्कोअर करण्याची भारताची ही १००वी वेळ आहे. १०० वेळा ३०० रन्स केल्यानंतर भारत ७८ मॅचमध्ये विजयी झाला आहे.
भारतानंतर ऑस्ट्रेलियानं वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३०० पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं ९६ वेळा ३०० पेक्षा जास्त रन्सचा टप्पा ओलांडला. पण ऑस्ट्रेलियानं ८५ वेळा ३०० पेक्षा जास्त रन्स करून मॅच जिंकल्या आहेत.
एप्रिल १९९६मध्ये भारतानं पहिल्यांदा वनडे क्रिकेटमध्ये ३०० रन्सचा टप्पा ओलांडला होता. शाहरजामध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारतानं ३०५ रन्स केल्या होत्या. १९९०च्या दशकामध्ये भारतानं ११ वेळा, २०००च्या दशकामध्ये ४७ वेळा आणि २०१०च्या दशकामध्ये ४२ वेळा ३०० रन्सचा टप्पा ओलांडला.