INDvsAUS: विराटची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १९१ रनची गरज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे.

Updated: Feb 27, 2019, 08:54 PM IST
INDvsAUS: विराटची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १९१ रनची गरज title=

बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच यानं टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर २० ओव्हरमध्ये भारतानं १९०/४ एवढा स्कोअर केला. शेवटच्या ६ ओव्हरमध्ये भारतानं तब्बल ९१ रन केले. कर्णधार विराट कोहलीनं ३८ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता. धोनीनंही कोहलीला चांगली साथ दिली. धोनीनं २३ बॉलमध्ये ४० रन केले.

या मॅचमध्ये भारतानं रोहित शर्माऐवजी शिखर धवनला संधी दिली होती. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. केएल राहुल आणि शिखर धवन ओपनिंगला आले होते. पण धवन २४ बॉलमध्ये फक्त १४ रन करून माघारी परतला. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक करणाऱ्या केएल राहुलनं या मॅचमध्ये २६ बॉलमध्ये ४७ रन केले. ऋषभ पंतही १ रन करून आऊट झाला. शेवटच्या ओव्हरला बॅटिंगला आलेला दिनेश कार्तिक ३ बॉलमध्ये ८ रन करून नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफ, नॅथन कुल्टर नाईल, पॅट कमिन्स आणि डीआर्सी शॉर्ट यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. पहिल्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे सीरिज बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा