Priyank Panchal | रोहित शर्माच्या जागी संधी मिळालेला प्रियांक पांचाल कोण आहे?

रोहित 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. रोहितच्या जागी संघात प्रियांक पांचालला (Priyank Panchal) संधी देण्यात आली आहे.  

Updated: Dec 13, 2021, 09:48 PM IST
Priyank Panchal | रोहित शर्माच्या जागी संधी मिळालेला प्रियांक पांचाल कोण आहे? title=

मुंबई : टीम इंडियाचा (Team India)  सलामीवीर कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेला (India vs South Africa Test Series) मुकावं लागणार आहे. रोहितच्या मांडीला दुखापत (Hamstring Injury) झाली आहे. त्यामुळे रोहित 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. रोहितच्या जागी संघात प्रियांक पांचालला (Priyank Panchal) संधी देण्यात आली आहे. (india tour south africa 2021 know who is priyank panchal who replaced to rohit sharma)   

प्रियांकने कुठेही चर्चा नसताना थेट सिनिअर संघात धडक मारली आहे. त्यामुळे हा नेमका कोण आहे, याच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. 

टीम इंडियाची ए टीम (Team India A) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दक्षिण आफ्रिका ए (South Africa A) टीम विरुद्ध 4 दिवसीय कसोटी सामन्यांची मालिका खेळतेय. प्रियांक या टीमचा कॅप्टन आहे. 
  
प्रियांकबाबत थोडक्यात माहिती
 
प्रियांक हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचं प्रतिनिधित्व करतो. प्रियांक ओपनर बॅट्समन आहे. प्रियांकने गेल्या काही काळात गुजरातसाठी धमाकेदार फलंदाजी केली आहे. प्रियांकने सात्त्याने रणजी ट्रॉफी, दुलिप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी यासारख्या महत्व्चाच्या देशांतर्गत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

प्रियांकची प्रथम श्रेणी कारकिर्द 

प्रियांकने आतापर्यंत एकूण 98 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने  45 च्या सरासरीने 6 हजार 891 धावा केल्या आहेत. यात 24 शतक आणि तितक्याच अर्धशतकांचा समावेश आहे. प्रयांकचा 314 हा हायस्कोर आहे. 

प्रियांकने 2008 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. प्रियांक हा गुजरातचा असा एकमेव फलंदाज आहे, ज्याने रणजी करंडकात ट्रिपल सेंच्युरी लगावली आहे. तसेच प्रियांक हा एकाच रणजी स्पर्धेत 1 हजार धावा करणारा गुजरातचा पहिला फलंदाज आहे.      

प्रियांकला इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी राखीव खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र त्याला प्लेंइग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.