India vs England 1st Test | भारताच्या विजयाच्या मार्गात पावसाचा अडथळा, पहिला कसोटी सामना अनिर्णित

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (England Captain Joe Root) या सामन्यात शतकी कामगिरी केली. त्यासाठी रुटला सामनावीर (Man Of The Match) पुरस्काराने गौरवण्यात आले.

Updated: Aug 8, 2021, 10:40 PM IST
 India vs England 1st Test | भारताच्या विजयाच्या मार्गात पावसाचा अडथळा, पहिला कसोटी सामना अनिर्णित title=

नॉटिंगघम : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी (India vs England 1st Test)  सामना हा पावसाच्या अडथळ्यामुळे अनिर्णित झाला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी चौथ्या दिवशी विजयासाठी 209 धावांचे आव्हान दिले होते. भारताने चौथ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 52 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाचव्या दिवशी भारताला विजयी सलामीसाठी केवळ 157 धावांची गरज होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara ) हे दोघेही 12 धावांवर नाबाद होते. त्यामुळे भारताच्या विजयाची संधी अधिक होती. पण पाचव्या दिवसाच्या खेळाआधी पावसानेच 'खेळ' केला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यातील शेवटच्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. परिणामी पहिली कसोटी अनिर्णित राहिली.  (India vs England 1st Test day 5th match has drawn due to rain at Trent Bridge Nottingham)

कर्णधार रुटच्या शतकाने इंग्लंडला सावरलं..

या पहिल्या टेस्टचा निकाल चौथ्या दिवशीच लागला असता, पण इंग्लंडला कर्णधार जो रुटच्या शतकाने बचावलं. रुटने चौथ्या दिवशी 109 धावांची शतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडचा पराभव हा पाचव्या दिवसांपर्यंत लांबला. इंग्लंडने पहिल्या डावात 183 धावा केल्या. प्रत्युतरादाखल भारताने पहिल्या इनिंगमध्ये ऑलआऊट 278 धावा केल्या. यासह आघाडी घेतली. दुसऱ्या डावात कर्णधार रुटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 303 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताला विजयासाठी 209 धावांचे आव्हान मिळाले. भारताने चौथ्या दिवसअखेर 1 विकेटच्या बदल्यात  52 धावा केल्या.

आता पाचव्या दिवशी टीम इंडिया यजमान इंग्लंडला पराभूत करत विजयी पताका उंचावेल, अशी आशा प्रत्येकाला होती. भारताचा विजय प्रत्येक टीम इंडियाच्या चाहत्याला दिसत होता. पण इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावून आला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.   

दुसरा कसोटी सामना केव्हा? 

दरम्यान या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा आता क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्डसमध्ये खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्याचे आयोजन हे  12 ते 16 ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.