क्रिकेट: भारत विरूद्ध इंग्लंड; आज लॉर्ड्स स्टेडियमवर

३ वनडे मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच नोटिंगहमच्या ट्रेन्ट ब्रिजमध्ये खेळवण्यात येत आहे. २६९ रनचा पाठलाग करून सीरिजमध्ये १-०नं आघाडी मिळवण्याची संधी भारताला आहे.

Updated: Jul 14, 2018, 11:54 AM IST
क्रिकेट: भारत विरूद्ध इंग्लंड; आज लॉर्ड्स स्टेडियमवर

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंडमध्ये आज(शनिवार, १४ जुलै)  लॉर्ड्स स्टेडियमवर दुसरी एकदिवसीय लढत रंगणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिली लढत जिंकत भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे. यामुळे आजची लढत जिंकत मालिका जिंकण्याच्या इराद्यानंच कोहली एँड कंपनी आज मैदानात उतरतील.

दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरू

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताचा फिरकीटपटू कुलदिप यादवच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. यामुळे पुन्हा एकदा त्याच्या फिरकीची धास्ती इंग्लंडच्या फलंदाजांनी घेतली असेल. भारतीय संघानं जानेवरी २०१६ ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावलेली नाही. त्यानंतर सलग ९ मालिका जिंकल्या आहेत. आज दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल.

भारताला चांगली संधी

३ वनडे मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच नोटिंगहमच्या ट्रेन्ट ब्रिजमध्ये खेळवण्यात येत आहे. २६९ रनचा पाठलाग करून सीरिजमध्ये १-०नं आघाडी मिळवण्याची संधी भारताला आहे.