केएलच्या शतकाचा राग? इंग्लंडच्या समर्थकांनी K L Rahul वर शॅम्पेनची झाकणं फेकली, विराट म्हणतो...

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी (India vs England 2nd Test) सामन्याचा आजचा (14 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे.   

Updated: Aug 14, 2021, 09:22 PM IST
केएलच्या शतकाचा राग? इंग्लंडच्या समर्थकांनी K L Rahul वर शॅम्पेनची झाकणं फेकली, विराट म्हणतो...

लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी (India vs England 2nd Test) सामन्याचा आजचा (14 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर (Lords Cricket Ground) खेळवण्यात येत आहे. लॉड्स ग्राऊंडला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांनी ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या या  मैदानावर भारतीय खेळाडूसोबत गैरवर्तन केलंय. इंग्लंडच्या चाहत्यांनी टीम इंडियाकडून ऐतिहासिक शतक ठोकणाऱ्या केएल राहुलवर (K L Rahul) शॅम्पेनची झाकणं (Champagne Cork) फेकली आहेत. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल होतोय. इंग्लंडच्या समर्थकांनी केलेल्या या प्रकारामुळे आता भारतीयांकडून याचा निषेध केला जात आहे. (india vs england 2nd test 3rd day english fans thrown champagne cork at KL Rahul who was in the 3rd Man Position)

नक्की काय झालं?

केएल थर्डमॅनवर फिल्डींग करत होता. सामन्यातील 68 वी ओव्हर होती. या दरम्यान इंग्लंडच्या चाहत्यांनी केएलच्या दिशेने कॉर्क फेकायला सुरुवात केली. यानंतर केएलने हे कॉर्क बाऊंड्री लाईनच्या बाहेर टाकले. तसेच केएलने कॅप्टन विराट कोहलीला याबाबतची कल्पना दिली. या सर्व प्रकारामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला.  केएलच्या आसपास जवळपास एकूण 6-7 कॉर्क फेकल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. याचे फोटोही व्हायरल होत आहेत.

विराट म्हणतो परत फेकून मार...

केएलने विराटला स्टँडमधून कॉर्क फेकले जात असल्याची कल्पना दिली. यावर तेच कॉर्क स्टँडमध्ये परत फेकून दे, असं इशारा विराटने केएलला केला.  

केएलच्या शतकाचा राग?

दरम्यान केएलने या सामन्याच्या पहिल्या डावात 129 धावांची उल्लेखनीय शतकी खेळी केली. यासह केएल लॉर्ड्सवर शतक ठोकणारा 10 वा भारतीय फलंदाज ठरला. टीम इंडियाने या पहिल्या डावात सर्वबाद 364 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या लंचब्रेकपर्यंत 3 विकेट्स गमावून 73 ओव्हरमध्ये 216 धावा केल्या आहेत.