close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भारत-इंग्लंड चौथी टेस्ट : जो रूटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला आहे.

Updated: Aug 30, 2018, 03:53 PM IST
भारत-इंग्लंड चौथी टेस्ट : जो रूटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

साऊथम्टन : भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला आहे. कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही. विराट कोहलीनं लागोपाठ ३८ टेस्ट मॅचमध्ये बदल केले होते. त्यानंतर आता ३९ व्या टेस्टमध्ये भारतीय टीम एकाही बदलाविना मैदानात उतरत आहे. तर इंग्लंडच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आलेत. क्रिस वोक्स फिट नसल्यामुळे सॅम कुरनला संधी देण्यात आली आहे. तर मोईन अलीचीही निवड झाली आहे. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनना दिलासा देणारं वक्तव्य जो रूटनं टॉसवेळी केलं आहे. बेन स्टोक्सच्या गुडघ्याला दुखापत असल्यामुळे तो या मॅचमध्ये खेळत असला तरी बॉलिंग टाकणार का नाही याबाबत शंका आहे, असं रूट म्हणाला. पहिल्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये जो रूटनं भारताला मोक्याच्या क्षणी धक्के दिले होते. ती मॅच भारत फक्त ३१ रननी हारला होता.

पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला होता. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये १-२नं पिछाडीवर असलेली विराटची टीम ही मॅच जिंकून सीरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरली आहे.

भारतीय टीम 

शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

इंग्लंडची टीम

एलिस्टर कूक, केटन जेनिंग्स, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, मोईन अली, सॅम कुरन, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अंडरसन

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा