Ind vs Eng: हे 2 खेळाडू ठरले भारताच्या पराभवाचे व्हिलन

इंग्लडचा 6 गडी राखून विजय

Updated: Mar 27, 2021, 08:45 AM IST
Ind vs Eng: हे 2 खेळाडू ठरले भारताच्या पराभवाचे व्हिलन title=

पुणे : पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताने (Team India) दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाने (Team England) 39 बॉल मागे सोडत आणि 6 विकेट राखत विजय मिळविला. लियाम लिव्हिंग्स्टोनने 21 बॉलमध्ये 27 धावांवर नाबाद खेळी केली तर डेव्हिड मलानने 23 बॉलमध्ये 16 धावा ठोकल्या. 

केएल राहुलच्या 108 धावांच्या खेळीवर जॉनी बेअरस्टो (124) आणि बेन स्टोक्स (99) च्या वेगवान खेळीने पाणी फेरलं. भारतासाठी कृष्णाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. भारताकडून कुलदीप यादवने 10 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट न घेता 84 धावा दिल्या. 

भारतीय संघाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 336 रन केले होते. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक 108 रन केले. तर रोहित शर्माने 25, शिखर धवनने 4, विराट कोहलीने 66, ऋषभ पंतने 77, हार्दिक पांड्याने 35 तर कृणाल पांड्याने 12 रन केले.

या सामन्यात खराब बॉलिंग हे टीम इंडियाच्या पराभवाचे कारण बनले. कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांच्या बॉलिंगच्या फडशा पाडला गेला. कृणाल पांड्या आणि कुलदीप हे दोघे सर्वात महागडे गोलंदाज ठरले. क्रुणाल पांड्याने 6 षटकात विकेट न घेता 72 धावा दिल्या. कृणाल पांड्याचा इकॉनॉमी रेट 12 होता. 

कृणाल पांड्या व्यतिरिक्त कुलदीप यादवने 10 षटकांत कोणतेही बळी न घेता 84 धावा दिल्या. कुलदीप यादवची फिल्डिंगही खराब राहीली. त्याने 34 व्या षटकात  बेन स्टोक्सचा झेलही सोडला. 

कुलदीप यादवने कृणाल पांड्याच्या हद्दीत चौकार असताना साधा कॅच सोडला. त्यानंतर बेन स्टोक्सने 81 धावा केल्या. कुलदीपने पकडलेला कॅच षटकारात बदलला.

जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. जॉनी बेयरस्टोने 111 चेंडूंत 124 आणि बेन स्टोक्सने 52 चेंडूत 99 धावा केल्या. बेअरस्टोने त्याच्या खेळीत 11 फोर आणि सात षटकार लगावले. स्टोक्स शतकी खेळी करु शकला नाही. पण त्याच्या चार फोर आणि दहा सिक्सर्सनी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 114 चेंडूंत 175 धावांची भागीदारी केली. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन (नाबाद 27) आणि डेव्हिड मालन (नाबाद 16) यांनी इंग्लंडला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. 

तीन मॅचच्या सिरीजमध्ये इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी केली. वनडे सिरीजमधील निर्णायक सामना रविवारी पुण्यातच खेळवला जाईल. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना पुण्यात 28 मार्च रोजी खेळला जाणार आहे.