इंग्लंड दौऱ्यात विराटच्या ५०० रन पूर्ण, मोडली एवढी रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं अर्धशतक पूर्ण केलं.

Updated: Sep 2, 2018, 08:17 PM IST
इंग्लंड दौऱ्यात विराटच्या ५०० रन पूर्ण, मोडली एवढी रेकॉर्ड title=

साऊथम्टन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकाबरोबरच कोहलीनं ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ५०० रनचा टप्पा ओलांडला आहे. ५८ रनवर विराट कोहली आऊट झाला. भारताबाहेरच्या टेस्ट सीरिजमध्ये ५०० रन करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू आहे. तसंच इंग्लंडमध्ये ५०० रन करणारा विराट पहिला आशियाई कर्णधार बनला आहे. इंग्लंडमध्ये ५०० रन करणारा विराट तिसरा भारतीय खेळाडू आहे.

पहिल्या टेस्टमध्ये विराटनं १४९ आणि ५१ रन, दुसऱ्या टेस्टमध्ये २३ आणि १७ रन, तिसऱ्या टेस्टमध्ये ९७ आणि १०३ रन आणि चौथ्या टेस्टमध्ये ४६ आणि ५८ रन केले. या सीरिजमध्ये विराट कोहलीनं आत्तापर्यंत ५४४ रन केले आहेत.