दुबई : युएईमध्ये सुरु असलेल्या आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) आज टीम इंडिया आणि हाँगकाँग (India vs Hong Kong) आमने सामने येणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता असतानाचं आज आम्ही तुम्हाला क्रिकेट जगतातला एक असा किस्सा सांगणार आहोत, ज्यामध्ये हाँगकाँग (Hong Kong) संघाने अक्षरशा टीम इंडियाच्या (team india) नाकात दम केला होता. या सामन्यात नेमकं का झालं होतं? भारताने हा सामना जिंकला होता का? जाणून घेऊयात.
चार वर्षापुर्वी म्हणजेच 2018 ला आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) भारत आणि हाँगकाँग आमने सामने आले होते. त्यावेळी आशिया कपचा फॉरमॅट 50 ओव्हर्सप्रमाणे होता, आता तो बदलून टी20 प्रमाणे झाला आहे. या 50 ओव्हर्सच्या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या हाँगकाँगने टीम इडियाच्या (team india) नाकात दम करून टाकला होता. भारत सामना जिंकेल की नाही इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. नेमका सामना कसा रंगला होता, तो जाणून घेऊयात.
असा रंगला होता सामना
आशिया कपच्या (Asia Cup 2022) या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला होता. या सामन्यात हाँगकाँगसारख्या दुबळ्या समजणाऱ्या संघाविरूद्ध टीम इंडिया (team india) 400 धावा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. हाँगकाँगच्या बॉलर्सने उत्कृष्ट बॉलिंग करत टीम इंडियाला 285 धावांत गुंडाळलं होतं. टीम इंडियाकडून (team india) शिखर धवनने (127) आणि अंबाती रायडूने (60) धावांची खेळी केली होती. या सामन्यात किंचित शाहने 3 आणि एहसान खानने 2 विकेट घेत उत्कृष्ट बॉलिंग केली होती.
टीम इंडियाच्या बॉलर्सची धुलाई
हाँगकाँगचे फलंदाज ज्यावेळेस मैदानात उतरले, तेव्हा त्यांनी टीम इंडियाच्या (team india) बॉलर्सची तुफान धुलाई केली. हाँगकाँगच्या निजाकत खान (92) आणि अंशुमन रथ (73) यांनी पहिल्या विकेटसाठी 174 धावांची भागीदारी केली होती. या दोन्ही बॅटसमननी हाँगकाँगच्या विजयाचा आशा उंचावल्या होत्या.एक वेळ असे वाटत होते की, हाँगकाँग हा सामना जिंकेल मात्र तसे काही झाले नाही. आणि एका विकेटनंतर सामना फिरलाय.
एका विकेटने सामना फिरला
हॉगकॉंगचा पहिली विकेट पडताच सामना संपुर्ण फिरला. टीम इंडियाचे (team india) बॉलर्स खलील अहमद, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या त्रिकुटाने बॅक टू बॅक विकेट्स काढत सामन्यात पुनरागमन केले. आणि हाँगकाँगचा संपूर्ण संघ 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 259 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना अवघ्या 26 धावांनी जिंकला. या विजयाने टीम इंडिया एका दुबळ्या संघाविरूद्ध पराभूत होण्यापासून वाचली.