India vs Hong Kong : 'या' मुंबईकर खेळाडूला हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात मिळणार डच्चू?

Asia Cup 2022 : मुंबईकर खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पाकिस्तान विरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. 

Updated: Aug 30, 2022, 11:45 PM IST
India vs Hong Kong : 'या' मुंबईकर खेळाडूला हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात मिळणार डच्चू? title=

यूएई : टीम इंडियाने (Team India) आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) विजयी सलामी दिली. टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चितपट केलं. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मात्र मुंबईकर खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे कॅप्टन (Rohit Sharma) रोहित शर्मा हाँगकाँग (India vs Hong Kong) विरुद्धच्या सामन्यातून सूर्यकुमार यादवला वगळू शकतो. (asia cup 2022 ind vs hkg team india captain rohit sharma may be dropped to suryakumar yadav in playing 11 against hongkong) 

सूर्यकुमारची निराशाजनक कामगिरी

सू्र्यकुमारने पाकिस्तान विरुद्ध फार उल्लेखनीय कामगिरी केली नाही. पाकिस्तान विरुद्धच्या ओपनिंग जोडीने निराशा केली होती. केएल राहुल भोपळा न फोडता माघारी परतला होता.  रोहित शर्मा आणि विराट कोहलीही अपयशी ठरले. अशात  सूर्यकुमारवर जबाबदारी होती. मात्र टीम इंडिया अडचणीत असताना सूर्यकुमारही आऊट झाला.  

सूर्याने पाकिस्तान विरुद्ध 18 बॉलमध्ये 18 धावांची खेळी केली. संथ खेळी केल्याने सूर्यकुमारवर टीकाही करण्यात आली. त्यामुळे रोहित सूर्यकुमारला हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात विश्रांती देऊ शकतो. तर त्याच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळू शकते.