VIDEO: चित्त्यापेक्षा चपळ धोनी, सेकंदाच्या आतच टेलर स्टम्पिंग

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा एकदा धोनीच्या चपळतेची चुणूक दिसून आली.

Updated: Jan 26, 2019, 02:02 PM IST
VIDEO: चित्त्यापेक्षा चपळ धोनी, सेकंदाच्या आतच टेलर स्टम्पिंग title=

माऊंट मॉनगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा एकदा धोनीच्या चपळतेची चुणूक दिसून आली. धोनीनं न्यूझीलंडच्या रॉस टेलरला सेकंदाच्या आतमध्येच स्टम्पिंग केलं. धोनीच्या स्टम्पिंगचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. केदार जाधवच्या बॉलिंगवर खेळत असताना रॉस टेलरचा पाय काही क्षणांसाठी वर गेला. मग धोनीला हीच संधी पुरली आणि त्यानं टेलरला माघारी पाठवलं. रॉस टेलर २५ बॉलमध्ये २२ धावा करून आऊट झाला.

फक्त विकेट कीपिंगच नाही तर बॅटिंगमध्येही धोनीनं त्याचा फॉर्म कायम ठेवला. धोनीनं ३३ बॉलमध्ये नाबाद ४८ धावा केल्या. धोनीच्या या खेळीमुळे भारताला ३२४ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या काही ओव्हरमध्ये केदार जाधवनंही धोनीला चांगली साथ दिली. केदारनं १० बॉलमध्ये नाबाद २२ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये धोनीला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्येही धोनीनं ३ अर्धशतकं केली होती. यातल्या शेवटच्या २ सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला होता. धोनीच्या या खेळीमुळे भारताचा मालिकेमध्ये २-१नं विजय झाला होता. ऑस्ट्रेलियात भारत पहिल्यांदाच द्विदेशीय एकदिवसीय मालिका जिंकला होता. या कामगिरीमुळे धोनीला मालिकाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं.