Ind vs Nz : न्यूजीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात या खेळाडूंनी BCCI कडे विश्रांतीची मागणी

 टी-20 वर्ल्ड कप (T20 world cup) मधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे (Team india) पुढचे लक्ष आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेवर आहे.

Updated: Nov 11, 2021, 04:17 PM IST
Ind vs Nz : न्यूजीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात या खेळाडूंनी BCCI कडे विश्रांतीची मागणी title=

नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कप (T20 world cup) मधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे (Team india) पुढचे लक्ष आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेवर आहे. भारताला 17 नोव्हेंबरपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची T-20 मालिका खेळायची आहे. 17 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका सुरू होणार असून ती 21 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर 25 नोव्हेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. (India vs New zealand series)

या दिग्गजाला मिळणार कसोटी कर्णधारपद!

एक-दोन दिवसांत कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) किंवा रोहित शर्मा (Rohit sharma) यांच्यापैकी एकाला कसोटी कर्णधारपद मिळू शकते, असे मानले जात आहे. विराट कोहली (Virat Kohli) याने बीसीसीआयला (BCCI) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेशिवाय पहिल्या कसोटीपासून विश्रांतीची विनंती केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनाही पहिल्या कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते.

याशिवाय पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतलाही विश्रांती दिली जाऊ शकते. जर ऋषभ पंत खेळत नसेल तर त्याच्या जागी रिद्धिमान साहा आणि केएस भरत यांची बॅकअप यष्टिरक्षक म्हणून निवड केली जाऊ शकते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. दुसरी कसोटी 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे. विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो.

येत्या काही महिन्यांत टीम इंडियाला भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात टी-20 आणि कसोटी मालिका खेळल्यानंतर भारत डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला 3 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs new zealand)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामने कानपूर येथील ग्रीन पार्क आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आले आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड पूर्ण वेळापत्रक

17 नोव्हेंबर: पहिला T20 - जयपूर
19 नोव्हेंबर: दुसरी T20 - रांची
21 नोव्हेंबर: तिसरी T20 - कोलकाता
25 ते 29 नोव्हेंबर: पहिली कसोटी - कानपूर
3 ते 7 डिसेंबर : दुसरी कसोटी - मुंबई