IND vs SA : रविंद्र जडेजा-अक्षर पटेलसह 4 खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर?

कोहली-द्रविडच्या अडचणी वाढणार, जडेजा-अक्षर पटेलसह हे 4 खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर?

Updated: Dec 8, 2021, 01:40 PM IST
IND vs SA : रविंद्र जडेजा-अक्षर पटेलसह 4 खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर?

मुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी आज संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहलीच्या अडचणी वाढणार आहेत. आधीच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे शेड्युलमध्ये बदल करण्यात आला आहे.

28 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया 3 कसोटी सामन्याची सीरिज खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये दुखापतीमुळे काही खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळणार नाहीत. अशी माहिती मिळाली आहे. तर आज टीम इंडियाचा स्क्वाड जाहीर होण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार  रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शुभमन गिल  इशांत शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे हे खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाही असं सांगितलं जात आहे. या चौघांनाही पूर्ण फीट होण्यासाठी काही वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. 

रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. दुखापतीमुळे जर सर्जरी करावी लागली तर कदाचित हे खेळाडू एप्रिलपर्यंत फीट होतील असं सांगितलं जात आहे. 

जडेजाच्या अनुपस्थितीमध्ये अक्षर पटेलने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात आपली उत्तम कामगिरी केली होती. अक्षर पटेलला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी 6 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो असं सांगितलं जात आहे. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जडेजा आणि अक्षरच्या जागी स्पिनर शाहबाज नदीम आणि सौरभ कुमार यांना संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आज स्क्वॉड जाहीर होणार आहे. त्यामुळे संघात कोणाला अजून संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.