IND vs SL | श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत या 2 खेळाडूंना Playing 11मध्ये संधी मिळणार?

टीम इंडिया या मालिकेत  2-0 ने आघाडीवर आहे.

Updated: Jul 22, 2021, 11:02 PM IST
IND vs SL | श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत या 2 खेळाडूंना Playing 11मध्ये संधी मिळणार? title=

कोलंबो : टीम इंडिया (Team India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील वनडे सीरिजमधील (Odi Series) तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी (23 जुलै) खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या मालिकेत  2-0 ने आघाडीवर आहे. भारताने आधीच मालिका जिंकली आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया काही बदल करु शकते. या सामन्यात संजू सॅमसन आणि राहुल चाहरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (india vs sri lanka 3rd odi team india likey be 2 changes in  Playing 11)

मनिष पांडेऐवजी संजू सॅमसन?

मनिष पांडे पहिल्या वनडेत अपयशी ठरला. त्याने 40 चेंडूत 26 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यातही विशेष काही करता आले नाही. त्यामुळे तिसऱ्या वनडेत संजू सॅमसनला संधी मिळू शकते. संजूला संधी मिळाल्यास त्याचे एकदिवसीय पदार्पण ठरेल. संजू गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे संजू पदार्पण करणार पांडे कायम राहणार, हे  लवकरच समोर येईल. 

कुलदीप यादवच्या जागी राहुल चहर?

राहुल चहरला या तिसऱ्या सामन्यात कुलदीप यादवच्या जागी डेब्यूची संधी मिळू शकते. राहुलने आयपीएलमध्ये मुंबईसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या जोरावर त्याची वनडे सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे. राहुलने टीम इंडियासाठी 3 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही खेळाडूंना संधी मिळणार की नाही, हे काहीच तासांमध्ये स्पष्ट होईल.