मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आज तिसरा सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला असून, पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 बदल करण्यात आले आहेत. या 4 बदलांसह टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियामधील पहिला बदल म्हणजे के एल राहुलला दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे. त्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे. दुसरं म्हणजे दीपक हुड्डाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आलं. त्याऐवजी शिखर धवन संघात परतला आहे. तिसरा बदल म्हणजे युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकुरला विश्रांती देण्यात आली आहे. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा बदल कुलदीप यादव आणि दीपक चाहरला संधी देण्यात आली आहे.
घरच्या मैदानात टीम इंडियाला पराभूत करणं वेस्ट इंडिजसमोर तगडं आव्हानच म्हणावं लागणार आहे. वेस्ट इंडिज संघाने 3 पैकी 2 सामने गमवले आहेत. त्यामुळे त्यांनीही संघात अकिला हुसैन ऐवजी हेडन वाल्श जूनियरला खेळण्याची संधी दिली आहे.
टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वाशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा
वेस्ट इंडिज - शाई होप, ब्रॅण्डन किंग, निकोलस पुरन, डॅरेन ब्रावो, शमारा ब्रुक्स, जेसन होल्डर, हेडन वाल्श जुनियर, फॅबियन एलेन, ओडियन स्मिथ, अल्जारी जोसेफ, केमर रोच
3RD ODI. India XI: R Sharma (c), S Dhawan, V Kohli, R Pant (wk), S Yadav, S Iyer, D Chahar, W Sundar, M Siraj, K Yadav, P Krishna https://t.co/yrDtxv7ATQ #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 11, 2022